
भामरागड येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पंढरपूर मधील पुळूजचा सुपूत्र शहीद....काही दिवसांवरच येऊन ठेपलं होतं लग्न
- by Adarsh Maharashtra
- May 18, 2020
- 1487 views
पंढरपूर :-एकीकडे पोलीस बांधव कोरोना संकटाविरोधात लढत असताना दुसरीकडे नक्षली कारवायांना उत आला आहे रविवार दि. 17 मे 2020 रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भामरागड तालुक्यातील पोरयकोटी-कोरपर्शी जगंलात नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. यात क्युआरटी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने आणि एक सी-60 पथकाचा जवान शहीद झाला आहे. या घटनेत तीन जवान जखमी झाले आहेत. धनाजी होनमाने हे पंढरपूर तालुक्यातील पुळूज गावचे सुपुत्र आहेत. याची माहिती समजताच पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली.
पुळूज या त्यांच्या गावाला धक्का बसला आहे. अतिशय हुशार आणि कर्तबगार अशी ओळख असलेल्या पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने हा पुळूजचा सुपुत्र होता.पहिल्यापासून पोलीस दलात जाण्याचे स्वप्न बघितलेल्या धनाजी यांची पोस्टिंग नक्षलवादी भागात झाली होती.
दबा धरून बसलेल्या नक्षल्यांचा गोळीबार
रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नक्षल्यांविरूध्द शोधमोहिम राबविताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी गोळीबार केला. यामध्ये प्रत्युत्तर देत असताना पोलीस उपनिरीक्षक धनाजी होममाने व पोलीस जवान किशोर आत्राम शहीद झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक होममाने हे सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील आहे. विशेष म्हणजे या चकमकीत एकही नक्षल ठार झाला नाही. जखमी जवानांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
तीन महिन्यापूर्वी झाला होता साखरपुडा
संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे थांबले असताना गडचिरोलीत नक्षल्यांशी मुकाबला करताना दोन विरांनी आहुती दिली आहे. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली असून पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहीद धनाजी होनमाने हे शेतकरी कुटुंबातील आहेत. भीमा सहकारी साखर कारखान्याजवळ त्यांची शेती आहे. तीनच महिन्यापूर्वी धनाजींचा साखरपुडा गावातील एका मुलीसोबत झाला होता. त्यांच्या जाण्याने दोन्ही परिवारांवर शोककळा पसरली आहे. चार महिन्यांपूर्वीच ते गावी येऊन गेले होते अशी माहिती गावकऱ्यांकडून मिळाली आहे.तर धनाजींना एक छोटा भाऊ असून तो उच्च शिक्षण घेत आहे, तर आई-वडील शेती करतात. दरम्यान, काही दिवसांनी धनाजीचा विवाह होता. मात्र, त्याआधीच धनाजीला विरमरण आल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धनाजी तानाजी होनमाने यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता.29 एप्रिल 2015 मध्ये त्यांची पुण्यामध्ये पोलीस उपनिरिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. 2017 मध्ये त्यांची पुण्याहून गडचिरोली याठिकाणी बदली झाली होती.अकरावी बारावीचे शिक्षण त्यांनी पंढरपूरमधील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून पूर्ण केले होते तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी पुणे गाठले होते. गडचिरोलीमध्ये त्यांनी अनेक धाडसी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग नोंदवला होता. पोलीस महानिरिक्षकांकडून त्यांचा सन्मान देखील करण्यात आला होता.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम