टोलनाका, चेकनाका ओलांडून देण्याच्या नावाने रिक्षाचालकांकडून होतेय मजुरांची लूट
- by Adarsh Maharashtra
- May 17, 2020
- 934 views
मुलुंड : (शेखर चंद्रकांत भोसले) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊनमुळे हाताशी रोजदार नसल्याने तसेच पोटभर अन्न मिळत नसल्याने मुंबई आणि उपनगरातून मोठ्या प्रमाणात परप्रांतीय स्थलांतरित पायी त्यांच्या गावी निघाले आहेत. या मजुरांना वाटेत अनेक ठिकाणी विशेषतः चेकनाक्यावर, टोलनाक्यांवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांकडून अडविले जात असून परत माघारी पाठविले जात आहे. त्यामुळे या स्थलांतरीतांच्या असहाय्यतेचा फायदा घेत काही रिक्षा चालक या मजुरांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारुन लॉकडाऊनच्या नियमांना फाट्यावर मारून एका रिक्षात दोनपेक्षा अधिक जणांना भरून टोलनाका, चेकनाका ओलांडून देत ठाण्याच्या हद्दीत सोडण्यात येत असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत.
ना हाताशी पैसा, ना प्रशासनातर्फे सोडण्यात येत असलेल्या रेलवे, बसची वाट पाहण्याचा संयम त्यामुळे आपल्या गावी जाण्याच्या ओढीने पायी निघालेल्या या मजुरांना टोलनाका, चेकनाका येथील बंदोबस्तावर असलेले पोलिस परत पाठवतील, अशी भीती दाखवत काही रिक्षा चालक प्रत्येकी १०० रूपये आकारत टोलनाका ओलांडून देत असल्याच्या घटना मुलुंड टोलनाक्यावर घडत आहेत. ठाण्याच्या हद्दीत शिरण्यासाठी तसेच चेकनाका आणि टोलनाक्यावरील पोलिसांपासून वाचण्यासाठी हे परप्रांतीय मजूर नाईलाजाने या रिक्षाचालकांना पैसे देत आहेत.
काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी यासंबंधीच्या तक्रारी पोलिसांना केल्यानंतर, वाहतूक पोलिसांनी या रिक्षा चालकांवर पाळत ठेवायला सुरुवात केली असून अश्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येणार
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम