लॉकडाऊनचे नियम न पाळता रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई

मुलुंड : (शेखर चंद्रकांत भोसले) ताळेबंदी लागू असताना देखील रस्त्यांवर रिक्षा चालविणाऱ्या रिक्षाचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलायला सुरुवात केली असून मुलुंड, भांडूप विभागात लॉकडाऊनचे पालन न करणाऱ्या ७६ रिक्षा, टॅक्सी चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. 

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सरकारतर्फे काही ठिकाणी शिथिलता देण्यात आली तरीदेखील लॉकडाऊनच्या पहिल्या दोन टप्प्याप्रमाणेच आताही रिक्षा, टॅक्सीच्या वाहतुकीवरील निर्बंध उठवलेले नव्हते. असे असूनही मुलुंड, भांडूप परिसरात अनेक रिक्षा, 
टॅक्सी रस्त्यांवर धावताना दिसत आहेत. त्यातील काही अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणांपर्यंत पोहचविण्यासाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे अश्याप्रकारे मुलुंड, भांडूप परिसरात बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांना वाहतूक पोलिस अडवत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करताना दिसत आहेत. 

अश्या प्रकारे लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन   करताना पहिल्या वेळी पकडले जाणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांवर वाहतूक विभागाकडून दंड आकारला जात आहे परंतु दुसऱ्या वेळी जर पुन्हा लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन या रिक्षा, टॅक्सी चालकांकडून करण्यात आले तर मात्र या वाहनचालकांची गाडी वाहतूक विभागाकडून जप्त करण्यात येत आहे. मुलुंड, भांडूपमधील गजबजलेल्या चौकात व महामार्गावर वाहतूक पोलिसांकडून अश्या प्रकारच्या कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट