आमदार महेद्रशेठ थोरवे पोहोचले आदिवासी वाड्यामंधे!
शेकडो आदिवासी बांधवांना अन्नधान्य केले स्वता वाटप! आसल हद्दीतील वाड्यांचा विकास होणार!
- by Adarsh Maharashtra
- May 15, 2020
- 323 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड);- रायगड जिल्ह्यातील आसल परीसरातील दुर्गम असणाऱ्या आदिवासी वाड्यांमधे कर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे जीवनावश्यक वस्तु वाटपासाठी पोहोचले. यावेळी प्रंचड आनंद या आदिवासी वाड्यामंधील लोकांना झाला आहे. दरम्यान ईतिहासात पहिल्यांदाच आमदार या वाडयामंधे पोहोचल्याचे येथिल आदिवासी कार्यकर्त्यांनी येथ बोलताना सांगितले आहे.
देशभर कोरोनाचे संकट आसल्याने कर्जत तालुक्यांतही अनेक ठिकाणी अनेक कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असतानाच तालुक्यांतील बहुजन व आदिवासी कुटुंबातील लोकांना मदतीचा हात देण्यासाठी गेले महिनाभर कर्जतचे आमदार झपाटल्यागत अन्नधान्य वाटप करीत आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघात बहुतांश गोरगरीब जनतेला आमदार थोरवे यांनी अन्नधान्य वाटप केले आहे. आज कर्जतचे आमदार थेट आसल ग्रामपंचायत हद्दीतील वाड्यामंघे पोहोचले. आणि येथिल शेकडो आदिवासी कुटुंबाना अन्नधान्य वाटप केले आहे.
यावेळी आमदार थोरवे यांच्या समवेत कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाल, पत्रकार धर्मानंद गायकवाड, उपतालुकाप्रमुख दशरथ भगत, विभाग प्रमुख शरद ठाणगे, विभागप्रमुख काळुराम पाटेकर, भगवान कोकरे, भाऊ ठाकरे, आसलचे उपसरपंच उमेश गायकवाड, दिपक गायकवाड, नथु लदग, सुभाष लदगे, पप्पू सावंत, माणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सांरग कराळे, नारायण पिरकड, मोहन वारगडे, यासह अनेक ग्रामपंचायत सदस्य या अन्नधान्य वाटपावेळी उपस्थितीत होते.
यावेळी येथिल आदिवासी बांधवांनी या परीसरातील असणाऱ्या रस्त्याची आणि पाण्याची समस्या आमदार थोरवे यांच्या समोर मांडल्या आहेत. या समस्या कोरोना तसेच पावसाळा संपताच सोडवण्याचे वचन आमदार महेद्रशेठ थोरवे यांनी दिले आहे. त्यामुळे प्रंचड उत्साह आसाल ग्रामपंचायत हद्दीतील वाड्यांमधील लोकांमधे पसरले आहे. तसेच आपण निवडणुकीत ईथे आलो नाही, मात्र आता माझा मतदार संघावर उपासमारीची वेळ आली असल्यानेच मी येथे पोहोचल्याचे सांगतात येथिल आदिवासी बांधव अक्षरशा गहीवरले आहेत. त्यामुळे मते मागायला येथे अनेक आले, मात्र आमदार ईतिहासात प्रथमच वाड्यामंघे आल्याचे सांगत येथिल लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान कर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे हे कोरोना कालात प्रंचड मतदार संघात नागरीकांना मदतीचा हात देत आहेत. शासन स्तरावरुनही गोरगरीबांना मदत मिळण्यासाठी आमदार प्रंचड मेहनत घेत आहेत. त्यामुळे कर्जत मतदार संघात कर्जतचे आमदार थोरवे यांनी केलेल्या अन्नधान्य वाटपाने अनेकांची उपासमार रोखली आसल्याने तालुक्यांत आमदार थोरवे यांचे व्यक्तीमत्व थोर असल्याचे बोलले जात आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम