परराज्यातील मजुरांच्या प्रवासी शुल्कासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५४ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग
- by Adarsh Maharashtra
- May 14, 2020
- 717 views
मुंबई:-लॉकडाऊन कालावधीत परराज्यातील स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी तसेच इतर राज्यात महाराष्ट्रातील स्थलांतरीत कामगार, मजुर अडकले आहेत त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी अशा मजुरांच्या श्रमिक रेल्वे तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार या ३६ जिल्ह्यांना ५४ कोटी ७५ लाख ४७ हजार ७० रुपयांचा निधी देण्यात आला असून तो संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
कोविड १९ च्या साथीमुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि महाराष्ट्रात इतर राज्यातील कामगार आणि मजुर अडकले. तसेच महाराष्ट्रातील कामगार आणि स्थलांतरीत मजुरही इतर राज्यांमध्ये अडकले आहेत. त्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळेल. सचिव आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन विभाग यांनी दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील रकमांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या निधीचा वापर केवळ ज्या कारणासाठी वितरित करण्यात आला आहे त्यासाठीच करता येणार आहे हे ही स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यांना देण्यात आलेला निधी असा:-
1 मुंबई शहर 12,96,00,000
2 मुंबई उपनगर 10,00,00,000
3 ठाणे 4,80,00,000
4 रायगड 2,50,00,000
5 रत्नागिरी 1,50,00,000
6 पालघर 3,00,00,000
7 सिंधुदूर्ग 1,00,00,000
8 नाशिक 40,00,000
9 धुळे 25,00,000
10 नंदुरबार 25,00,000
11 जळगांव 20,00,000
12 अहमदनगर 20,00,000
13 पुणे 8,00,00,000
14 सातारा 95,81,270
15 सांगली 30,00,000
16 सोलापूर 50,00,000
17 कोल्हापूर 1,25,91,400
18 औरंगाबाद 80,00,000
19 जालना 50,00,000
20 बीड 30,00,000
21 परभणी 50,00,000
22 हिंगोली 6,00,000
23 नांदेड 20,00,000
24 उस्मानाबाद 20,00,000
25 लातूर 60,00,000
26 अमरावती 30,00,000
27 अकोला 12,74,400
28 वाशिम 10,00,000
29 बुलढाणा 20,00,000
30 यवतमाळ 35,00,000
31 नागपूर 1,20,00,000
32 वर्धा 30,00,000
33 गोंदिया 25,00,000
34 भंडारा 24,00,000
35 चंद्रपूर 30,00,000
36 गडचिरोली 15,00,000
एकूण रूपये 54,75,47,070

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम