धक्कादायक :मालेगावात मनपा आयुक्तांनाच करोना ची लागण
- by Adarsh Maharashtra
- May 13, 2020
- 955 views
नाशिक (चंद्रशेखर गोसावी)-मालेगाव हा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून शासन दरबारी नोंदीत आहे.येथे काल 10 दिवसाच्या लहान मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला असुन पालिकेचे आयुक्त आणि उपायुक्त यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असुन आज आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषी मंत्री दादा भुसे याच्यासोबत मालेगावला बैठक सुरू असतानाच अहवाल प्राप्त झाला.यामुळे दोघांनीही तत्काळ बैठक सोडली खरी मात्र याच बैठकीत असलेल्या सर्व उच्चपदस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली असुन आता सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दुसरीकडे मालेगावसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला असुन वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांची बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी डॉ. प्रल्हाद गुठे यांची नियुक्ती करण्यात आली असून गुठे हे नाशिकच्या संदर्भ सेवा रुग्णलयात कार्यरत होते.मालेगाव शहरातील परिस्थिती आवाक्या बाहेर जाण्याचे अनेक कारन आहेत.त्यात प्रामुख्याने येथील नागरिकांमधे कोरोना संदर्भात पसरविलेला गैरसमज तर दुसरीकडे नागरिकांकडून प्रशासनास मिळणारा अत्याल्प प्रतिसाद अनेकांना कोरोनाची लागण होऊन देखील ते उपचारासाठी पुढे येत नाहीत तर लक्षन असतांना व त्रास होत असताना देखील शेवटच्या क्षणापर्यंत रुग्णालयात न जाणे यामुळे येथे जवळपास 14 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव खालोखाल येवला तालुका नाशिक शहर निफाड तालुका येथेही रुग्णांनाची संख्या वाढत असुन आता कोरोनाने खेड्या गावात देखील शिरकाव केला आहे.
आता तरी नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून वागावे व नियमांचे पालन करावे जेणेकरून कोरोनाला आपल्याला पळून लावता येईल.
नांदगांव तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ५ !
सुरवातिपासून ते 2 मे पर्यन्त कोरोनामुक्त असणाऱ्या नांदगांव तालुक्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५ वर जाऊन पोहचली असून मनमाड शहरात ४ तर ग्रामिण भागातील अमोदे येथील १ असे पाच रुग्ण तालुक्यात आहे.यांच्या संपर्कात आलेल्याचे स्वब पाठविण्यात आले असुन त्यांचे अहवाल आल्यानंतरच मनमाड व नांदगांव तालुक्यातील परिस्थिती लक्षात येईल.सध्या शहरातील आंनदवाडी यांसह आजूबाजूला असणारा परिसर कंटेनमेंट झोन म्हणुन घोषित केला असुन नव्याने रुग्ण सापडलेल्या आययुडीपी भागाला देखील कंटेनमेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहे.पालिका प्रशासनातर्फे सर्व ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली असुन अनेकांना त्यांनी विलगिकरण कक्षात ठेवले असुन त्यांच्या आरोग्याची उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरा मार्फत रोज तपासणी करण्यात येत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम