औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 600 पार

मुंबई, पुणे या दोन प्रमुख शहरांच्या पाठोपाठ आता औरंगाबाद जिल्ह्यात देखील कोरोनाबाधितांचा आकडा कमालीचा वाढला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांनी 600 चा टप्पा ओलांडला आहे.

आज औरंगाबाद जिल्ह्यात आणखी 61 नवे पॉझिटव्ह रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 619 वर पोहचली आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्डा यांनी ही माहिती दिली.

आज शहरातील रामगनर, किलेअर्क, एसआरीपएफचा एक जवान, सदानंनगर, न्यायनगर, दत्त नगर, कैलासनगर, भवानी नगर, जुना मोंढा, संजय नगर, एन-4,पुंडलिकनगर, बायजीपुरा, सातारा गाव, बीडबायपास, कोतवालपुरा या भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

चार दिवसांत 241 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहरवासीयांच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे. प्रशासनाकडून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न होत आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट