परहित चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने दिड महिन्या पासुन आदिवासी बांधवाना अविरहतपणे खाद्य सामुग्री वाटप .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर येथिल परहित चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने वरप कांबाच्या आदिवासी पाड्या मध्ये गेल्या दिड महिन्या पासुन जीवनावश्यक  वस्तुचे वाटप सुरु आहेत . येथिल आदिवासी बांधवाना शासनाने वाऱ्यावर सोडले परंतु परहित चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यानी या आदिवासी बांधवाना दिड महिन्या पासुन अविरहत पणे राशन फळे जीवनावश्यक वस्तुचे वाटप सुरु ठेवुन माणुसकी जपली आहे . 


उल्हासनगर शेजारी असलेले वरप कांबा गावा नजिक वाघेर पाडा  . नानेरपाडा . पाठरपाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहतात . कोरोना च्या महामारीमुळे देशात राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्याने या आदिवासी बांधवाना शासनाने अद्याप पर्यंत या तीन ही पाड्याला कोणती ही मदत केली नाही . तेव्हा उल्हासनगर येथिल परहित चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यानी गेल्या दिड महिन्या पासुन या तीन ही आदिवासी पाड्यातील बांधवाना राशन फळे आणि इतर जीवनावश्यक वस्तुचे वाटप सुरुच ठेवले आहे . त्यामुळे हे आदिवासी बांधव तग धरुन आहेत . यांच्या वाटपात एक ही दिवस खंड पडला नसुन दररोज विशालकुमार गुप्ता हे आपले सहकारी हिमांशु यादव . शुभम गुप्ता . संतोषकुमार यांच्या मदतीने जीवनावश्यक वस्तु चे वाटप करत आहेत . परहित चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यानी केलेल्या मदतीमुळे हे आदिवासी बांधव आभार मानत आहेत . 

संबंधित पोस्ट