डॉ अमोल देवळेकर एम डी कोरोना रोग लवकर नष्ट होईल असे वाटत नाही ,तथापी आपल्याला काम हे करावेच लागणार आहे
- by Adarsh Maharashtra
- May 11, 2020
- 1321 views
दैनंदिन जीवनामध्ये आपला रोज अनेक लोकांशी संपर्क येतो त्यामुळे यापुढे किमान १ वर्ष खालीलप्रमाणे काळजी घेणे अत्यंत आवश्यक झालेले आहे .
१) जितका वेळ शक्य असेल तितका वेळ सार्वजनिक शौचालये वापरु नयेत.
२) आपल्याकडे येणाऱ्या सर्व लोकांना त्यांच्या चपला बूट बाहेर काढण्यास सांगावे .
३) ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सॅनिटायझर ने हात स्वच्छ करण्यास सांगावे .
४) चलनी नोटा न हाताळता आपल्याला येणे असलेली रक्कम चेकने अथवा ई पेमेंटने स्वीकारावी .
५) आपले मित्र तसेच नातरवाईक व सहकारी यांचे दरम्यान ४ फूट अंतर कायमस्वरूपी राखावे .
७) कागदपत्रे हाताळताना, वाचताना, पान पलटताना थुंकी लावू नये .
८) अगदी गरजेच्या वेळेस ऑफिसमध्ये अथवा पार्किंग मध्ये उपस्थित राहून भेटावे.
९) अनेक क्लायंट वा मित्र यांना फोन जोडून देऊन या फोनवर बोला असे म्हणायची सवय असते शक्यतो असा प्रकार अजिबात करू नये फक्त स्वतःचाच मोबाईल फोन वापरावा .
१०) आपल्याला भेट देणाऱ्या व्यक्तीने मास्क घातला नसेल तर त्याच्याशी संभाषण करण्यास स्पष्ट नकार द्यावा .
११) अनेक वेळा गडबडीत आपण थुंकी लावून नोटा मोजतो ते पूर्णपणे टाळावे, रस्त्यावर थुंकु अगर पिंचकारी मारू नका.
१२) काम संपल्यानंतर लवकरात लवकर आपल्या घरी जावे व हातपाय धुवावे कपडे धुण्यास टाकावे वा स्वत:च धुवावेत.
१३) रस्त्यावरील खाद्यपदार्थ कापलेली फळे खाणे कायमस्वरूपी टाळावेत. घरातील भाजीपाला,फळे मीठाच्या पाण्यात १/२ तास भिजत ठेवावा.
१४) जुनी कागदपत्रे हाताळताना हॅण्डग्लोव्हज वापरा जास्तीत जास्त काळजी घ्यावी.
१५) पर गांवावरून येणाऱ्या लोकांची मित्रांची सहकार्याची नातेवाईक यांची संपूर्ण माहिती फोनवरून घ्यावी व तो आला असेल अंतर ठेवावे.
१६) शासनाकडून गेले २ महिना ज्या सूचना सुरू आहेत जसे साबणाने हात धुणे या सूचनांचा अंमल कायमपणे सुरू ठेवावा .
१७) शेकहॅण्ड पुर्णपणे टाळावेत व आपली परंपरागत नमस्काराची पद्धत अवलंब करावी .
१८) लॉकडाउन संपले वा शिथील केले याचा अर्थ कोरोनाचा विषाणू नष्ट झाला असा घेऊ नये.
१९) कोरोना झाला तर आपण बरे होऊ शकतो ,तथापि आजारी न पडणे हा उत्तम उपाय आहे .
२०) मला काय होतंय,मी ठणठणीत आहे ,माझी इम्युनिटी खूप चांगली आहे , मी आजारी पडू शकत नाही अशा अविर्भावात राहू नये .
२१) टू व्हीलरवरून प्रवास करताना पाठीमागील व्यक्तीला कानाजवळ येऊन बोलण्याची सवय असते अशा व्यक्तींना टू व्हिलरवर पाठीमागे बसवून घेऊन जाऊ नये, चार चाकी वाहनातून एकट्याने प्रवास करावा दोघांच्या सुरक्षिततेसाठी चालक टाळावा.
२२) फोन,मेसेजेस, व्हॉट्सॲप ,ई मेल या साधनांचा संभाषणासाठी जास्तीत जास्त वापर करावा .
२३) निदान यापुढे १ वर्षे पुणे मुंबई येथील कामे प्रवास करून करावी लागणारी सर्व कामे शक्यतो टाळावीत, किंवा ई फायलिंग व व्हिसीचा वापर करावा.
२४) गेल्या २ महिन्यांमध्ये आपल्याला एक गोष्ट समजली आहे की,जगण्यासाठी खूप कमी पैसे लागतात जे पैसे जादा लागतात ते पैसे जगण्यासाठी लागत नसून वागण्यासाठी लागतात हे लक्षात ठेवावे.
२५) पेट्रोल डिझेल यासाठी वारंवार पंपावर जाणे टाळावे,शक्य असेल त्यावेळी जास्तीत जास्त इंधन भरून घ्यावे.
२६) घरातील लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांचेकडे विशेष लक्ष द्यावे.
२७) जत्रा,यात्रा व जेवण,रस्सा पार्टी यासारखे कार्यक्रम शक्यतो १ वर्ष पुढेच ढकलावेत .
आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत ही भावना कायम जागृत ठेवावी.
पर्यावरण स्वच्छ झाले असले तरी आपल्याला कोरोना विषाणूंचे सायलेंट कॅरिअर दिसून येणार नाहीत !!
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम