सेलिब्रिटींच्या डाएटची काळजी घेणारी फूड सर्व्हिस माहितीये?

सेलिब्रिटींच्या डाएटनुसारच त्यांना खाद्यपदार्थ पुरवले जातात

मुंबई : बॉलिवूड चित्रपट किंवा एकंदरच एका कलाकाराची कोणतीही भूमिका आवडली, की त्या भूमिकेसाठी अमुक एका कलाकारासोबतच ती साकारण्यासाठी त्याने घेतलेले कष्टही प्रशंसेस पात्र ठरतात. आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेनुसार स्वत:मध्ये महत्त्वाचे बदल करण्याकडे सेलिब्रिटींचा कायमच कल असतो. दीपिका म्हणू नका, रणवीर म्हणू नका किंवा मग खिलाडी अक्षय कुमार. प्रत्येक कलाकार या वाटेवर निघाल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतं ते म्हणजे या सेलिब्रिटींचं डाएट, अर्थात त्यांच्या आहाराच्या सवयी. 

अमुक एका डाएटच्या अनुशंगाने त्यानुसार आहारही घेण्यास कलाकार मंडळी प्राधान्य देतात. ज्यामध्ये त्यांची भूक भागवत वेळप्रसंगी त्यांच्या आवडीनिवडींकडेही लक्ष देण्यासाठी सज्ज आहे, PoD supply ही खाद्यपदार्थ पुरवणारी सर्व्हिस. असं म्हटलं जातं की कबीर खान दिग्दर्शित '`83' या चित्रपटासाठीसुद्धा रणवीर सिंग याने PoD supplyला पसंती दिली होती. 'मिड- डे'च्या वृत्तानुसार या चित्रपटात एक सुदृढ खेळाडू साकारण्यासाठी म्हणून रणवीरला प्रोटीनचं प्रमाण जास्त असणारं डाएट देण्यात आलं होतं. ज्यानुसार त्याच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असेल हे ठरवण्यात आलं होतं. एक खास शेफ त्याच्या आहाराची काळजी घेण्यासाठी म्हणून लंडन येथे रवाना झाला होता.

गेल्या सहा वर्षांपासून रणवीर PoD supplyशी जोडला गेला आहे अशी माहिती सहसंस्थापक अनमोल सिंघल यांनी दिली होती. PoD supplyकडून पुरवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये रणवीरला 'हॅलेपिनो एँड क्रिस्प बेकन ऑम्लेट' हा आवडीचा पदार्थ. त्याशिवाय, ओट्स, अंडी, मिक्स्ड नट्स आणि ताज्या बेरीज यांचं एक 'मुश', या पदार्थाचा फायदा रणवीरच्या ताकदीला झाला.


संबंधित पोस्ट