मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल
महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते विधान भवनात उपस्थित; मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेदेखील हजर
- by Adarsh Maharashtra
- May 11, 2020
- 646 views
मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला आहे.ठाकरेंनी थोड्याच वेळापूर्वी विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दुसरे ठाकरे ठरले आहेत. त्याआधी आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंनी कधीही निवडणूक लढवलेली नव्हती. त्यामुळे उद्धव ठाकरे निवडणूक लढवणारे शिवसेनेचे पहिले पक्ष प्रमुख ठरले आहेत.
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीनं ५, तर भाजपानं ४ जणांना उमेदवारी दिल्यानं ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी उमेदवारी अर्ज भरला. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम