उल्हासनगरात कोरोना रुग्णाचा आकडा गेला ३९ वर शहरात भीतीचे वातावरण , एका दिवसात ४ रुग्ण मिळाले .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगरात एका दिवसात पुन्हा  ४  रुग्ण कोरोना बाधित आढळुन आल्याने शहरात हाहाकार माजला आहे . परवा  रात्री १५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असुन काल सकाळी पुन्हा दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता ३५ वर गेला होता  .तर पुन्हा नव्याने ४ रुग्ण कोरोना बाधित आढळुन आल्याने आता रुग्णांची संख्या ३९ वर गेली आहे 

शहरात भितीचे वातावरणनिर्माण 

उल्हासनगर शहरातील कॅंप ३ येथिल संम्राट अशोक नगर येथे राहणारी एक ३० वर्षीय महिला पाठीला गाठ असल्यामुळे कल्याण येथिल मीरा हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन करन्या करिता दाखल झाली होती . तेव्हा त्या महिलेची कोरोना चाचणी करन्यात आली होती . तर तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मीरा हॉस्पिटल वाल्याने  उल्हासनगर महापालिका प्रशासन अथवा मध्यवर्ती रुग्णालय प्रशासन याना न कळवता त्या महिला रुग्णाला मध्यवर्ती रुग्णालयाच्या गेट वरच अंब्युलंस मध्ये नेवुन सोडुन देन्यात आले . दरम्यान त्या महिलेला उल्हासनगर कॅंप ४ येथिल कोविड १९ रुग्णालयात उपचारा करिता दाखल केले . तर त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या संम्राट अशोक नगर येथिल २४ जणाना टाटा क्वारंटाईन सेंटर मध्ये क्वारंटाईन केले होते . तेथे त्यांचे स्वॅब घेवुन तपासणी करिता पाठवन्यात आले होते . तेव्हा २४ पैकी ११ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉइटिव्ह आले आहेत .तर हे ११ रुग्ण कोणा कोणा च्या संपर्कात आले आहेत याची चौकशी करुन संम्राट अशोक नगर मधील ४७ जणाना पुन्हा  ताब्यात घेवुन त्यांचे स्वॅब रेड क्रॉस मध्ये घेवुन त्याना टाटा क्वारंटाईन सेंटर मध्ये नेन्यात आले आहे .  शांतीनगर येथिल वडाळा येथे पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या घरचे तीन जणाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत . तर कॅंप ४ येथिल अंबिका सोसायटीत देखिल एका पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याने त्याना देखिल उपचारा करिता दाखल करन्यात आले आहे . तर कॅंप १ येथिल गोल मैदान परिसरातील दोन व्यक्तीचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत . दरम्यान कॅंप ४ येथिल श्रीराम नगर मध्ये पुन्हा नव्याने ४ कोरोना बाधित रुग्ण आढळुन आले आहेत . तेव्हा  शहरात कोरोना बाधितांचा आकडा आता ३९  वर गेला आहे . तर दोन  दिवसात २१  रुग्णांची भर पडल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे . हे सर्व रुग्ण कोविड १९ या रुग्णालयात उपचार घेत आहे .

संबंधित पोस्ट