कर्जत तालुक्यांतील नेरळ शहरात वाईन शाॅप बंद असल्याने कर्जत व चौकचे वाईन शाॅप समोर गर्दी!

दारुचा दुकानांसमोर शिस्तीत रांगाच रांगा!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील दारुची दुकाने (वाईन शाॅप) चालु करण्यात आली आहेत. मात्र कर्जत तालुक्यांतील नेरळ शहरातील वाईन शाॅप कंन्टेनमंट झोन मुळे बंदच असल्याने कर्जत मधील दारुची दुकाने (वाईन शाॅप) फुल्ल झाल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे किराणा मालाच्या दुकानांपेक्षाही काहींसाठी दारु महत्वाची असल्याचे बोलले जात आहे.

सध्या देशात कोरोना संकट असल्याने देश गेली अनेक दिवस लाॅकडाऊन  करण्यात आला आहे. मात्र आता देशांतील अनेक जिल्ह्यांचे विभाजन झोनमधे करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्याचा आॅरेंज झोनमधे समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आॅरेंज झोनमधे इतर काही व्यावसायासह दारुचे वाईन शाॅपही सुरु झाले आहेत. त्यामुळे दारु पिणाऱ्यांनी वाईन शाॅप समोर एकच गर्दी केली आहे. परीणामी लांबच्या लांब रांगा वाईन शाॅपसमोर लागल्याचे दिसुन येत आहे.

विशेष म्हणजे लाॅक डाऊन कालातही अत्यावश्यक सेवेच्या सुरु असणाऱ्या दुकानांसमोरही ईतकी गर्दी कधी दिसुन आली नाही. मात्र दारु या सेवेपेक्षाही अत्यावश्यक आहे की काय? असा संभ्रम जनमाणसांना पडला आहे. दारुची दुकानांसमोर अर्धा किलोमीटर पर्यंत रांगा दिसुन येत आहेत. सकाळी दारु आणावयास गेलेल्यांचा थेट नंबर संध्याकाळी येत असल्याची माहीती देणेत आली आहे. त्यामुळे काहींनी वाईन शाॅप समोर काही मजुरांना मजुरी देवुन वाईन खरेदीसाठी लाईनमघे उभे केल्याचे समजते.

परीणामी लाॅक डाऊन कालात गोरगरीबांना शासन आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांसह राजकीय नेते अन्नधान्याचे मोफत वाटप करीत आहेत. तर काहीं मात्र वाईन खरेदीवर पैसे उधळत असल्साचे दिसुन येत आहे. वाईन शाॅप खरेदी करणाऱ्यांनी एमआरपी किंमतीपेक्षा जास्त किमंतीस दारु विक्री न करण्याचे आवाहन दुय्यम निरीक्षक कर्जत यांनी केले आहे. तसे आढलल्यास थेट कारवाईचा ईशाराही दुय्यम निरीक्षकांनी दिला आहे. त्यामुळ दारु विक्रीत पारदर्शकताही असल्याचे चित्र दिसुन येत आहे. तसेच देशात पुन्हा लाॅक डाऊन होण्याची भिती काहींना भेडसावत असल्याने काहींनी वाईन शाॅप मधुन घरीच स्टाॅक करणेची तयारीही केली आसल्याचे सांगणेत येत आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यांतही वाईन शाॅपची दुकाने प्रंचड फुल्ल असुन अनेक दुकांनामधे दारुचा माल कमी पडत असल्याची चर्चा सुरु आहे. 

दरम्यान रायगड जिल्ह्यातील नेरळ शहरात ज्या परीसरात वाईन शाॅप आहे त्या परीसरात कोरोना पाॅझिटीव्ह सापडल्याने हा परीसर रायगड जिल्हाअधिकाऱ्यांनी कंटेनमेन्ट झोन घोषित केला आहे. त्यामुळे रायगडात दारुची (वाईन शाॅप) दुकाने सुरु होवुनही नेरळचे वाईन शाॅप बंदच असल्याने नेरळ शहरात दारु मिळविणेसाठी प्रंचड चढाओढ सुरु आसल्याचे दिसत आहे. तर काही थेट कर्जत व रायगड जिल्ह्यातील अन्य

ठिकाणी वाईन शाॅप मधे जावुन दारु खरेदी करुन आपली दारुची भुख भागवित असल्याने “दारु साठी, काय पण” असा सूर काही काढत आहेत. तर कर्जतचे वाईन शाॅप फुल्ल असल्साने लांबच लांब रांगा या दुकानांसमोर दिसुन येत आहेत. काही वाईन शाॅप समोर तर पोलिसांचीही ड्यूटी असल्साचा माहीती देण्यात आली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट