खाकी वर्दीतील माणुसकी,काळजात घर करेल या फोटोमागची कहाणी
- by Adarsh Maharashtra
- May 10, 2020
- 1371 views
मुंबई, : जगात कोरोनामुळे संपूर्ण हाहाकार परसरला असताना पोलीस विभाग मात्र आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. या खाकी वर्दीतली माणूसकी आपण सगळ्यांनी पाहिली आहे. असाच एका मनाला घर करणारा प्रकार मुंबईच्या विरारमध्ये समोर आला आहे. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना समोर आली असून खाकी वर्दितली कर्तव्या पलिकडची माणुसकी पाहायला मिळाली आहे.
विरार पूर्वेकडील फुलपाडा इथे प्रमोद खारे, वय 45 यांचं तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल. मात्र, कोणीही नातेवाईक लॉकडाऊनमुळे येऊ न शकल्याने पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी स्वतः मृतदेहावर अंतिम संस्कार करून नातेवाईकांना व्हिडीओ कॉल करून दर्शन घडवलं.
फुलपाडा इथले प्रमोद खारे हे घरी एकटेच असतात. त्यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. पण लॉकडाऊन असल्यामुळे त्यांचे नातेवाईक कोलकाता आणि दिल्लीवरून अंत्यसंस्कारासाठी येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही नव्हतं. मात्र, पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी मयत प्रमोद खरे यांचा बंद झालेला मोबाईल चार्ज करून नातेवाईकांशी संपर्क साधला.
लॉकडाऊनमुळे नातेवाईकांना येण्यासाठी एक दिवस प्रेत राखून ठेवलं मात्र, त्यांना येता आलं नाही. नातेवाईकांनी पोलीस सुभाष यांना अंतिम संस्कार करण्यास विनंती केली आणि अखेरच दर्शन व्हिडीओ कॉलद्वारे घेऊन साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. अशा या योध्याने केलेल्या कामाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्यांच्या या माणूसकिचं सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम