Uber Cab कडून ३७०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची घोषणा
- by Adarsh Maharashtra
- May 07, 2020
- 689 views
मुंबई,-कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचा अनेक कंपन्यांवर फरक पडत आहे. नुकतीच अमेरिका आणि जगातील सर्वात मोठी जिम कंपनी Gold Gym ने या काळात आपलं दिवाळ निघाल्याच घोषित केलं. यानंतर आता जगातील सर्वात मोठी कॅब सर्व्हिस कंपनी उबर (Uber)वर देखील संकट कोसळलं आहे. कंपनीने जाहिर केलं आहे की, आर्थिक संकटामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढावं लागेल.
अॅप आधारित कॅब सर्व्हिस पुरवणाऱ्या Uber ने ३,७०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची घोषणा केली आहे.युएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमीशनमध्ये (एसईसी) कंपनीकडून याबाबत माहिती देण्यात आली. “करोना व्हायरस महामारीमुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट आणि व्यवसायावर झालेला परिणाम, यामुळे कंपनीने खर्च कमी करण्याची योजना आखली आहे.यानुसार, कस्टमर सपोर्ट आणि रिक्रुटर्स टीममध्ये कपात केली जात आहे. एकूण ३ हजार ७०० फुल-टाइम कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं जाईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं. भविष्यात अजून कपात करावी लागू शकते असे संकेतही कंपनीने दिलेत.
दरम्यान, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)ने ३ मे अखेरच्या आठवड्यापर्यंतची माहिती विचारात घेऊन हा अहवाल तयार केला आहे. देशात लॉकडाउन सुरू झाले, त्यावेळी बेरोजगारीचे प्रमाण ७ टक्क्यांपर्यंत होते. लॉकडाउनच्या काळामध्ये बेरोजगारी वाढली आहे. सध्या भारतातील बेरोजगारीचे प्रमाण २७.११ टक्के झाले आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामधील बेरोजगारी ही अधिक असल्याचे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण २६.६९ टक्के, तर शहरी भागात २९.२२ टक्के आहे. लॉकडाउननंतर महानगरामधील उद्योगधंदे बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे अनेक स्थलांतरित हे पुन्हा आपल्या मूळगावाला परतले आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम