उल्हासनगरातील बाबा रामदेव शिक्षण सस्थेच्या वतीने आशा वर्कराना शिल्ड मास्कचे वाटप .
- by Rameshwar Gawai
- May 06, 2020
- 887 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : कोरोना विषाणुशी सर्वच यंत्रणा झुंज देत आहेत . त्या मध्ये आशा वर्कर देखिल मागे नाहीत . ह्या महिला घरोघरी जावुन कोणाला कोरोनाचा संसर्ग झाला का याची माहीती घेत आहेत .परंतु त्याना शासना कडुन खरबरदारी म्हणुन मास्क शिवाय काही ही देन्यात येत नाही . तेव्हा शहरातील बाबा रामदेव शिक्षण सस्थेचे अध्यक्ष बाबुभाई परमार यानी या आशा वर्कराना शिल्ड मास्क व सॅनिटायझर सह इतर साहित्य वाटप केले आहे .
उल्हासनगर शहरातील आरोग्य यंत्रणा कोरोना या महामारीशी लढत आहे . यात आशा वर्कर देखिल मागे नाहीत . या आशा वर्कर महिलाना शासना कडुन फक्त मास्क शिवाय काही मिळत नाही अशातच त्या आशा वर्कर महिला घरोघरी जावुन कोणाला कोरोना संसर्ग आहे का याची चौकशी करुन माहीती गोळा करत आहेत . तेव्हा बाबा रामदेव शिक्षण सस्थेचे अध्यक्ष बाबुभाई परमार यानी उल्हासनगर कॅंप २ येथिल आरोग्य केंद्र न . १ येथे या आशा वर्कराना युवासेने चे युवा अधिकारी बाळासाहेब श्रीखंडे . डॉ अभिजित वानखडे यांच्या हस्ते आशा वर्कर महिलाना मास्क शिल्ड व सॅनिटायझर आणि इतर साहित्य वाटप केले आहे . बाबा रामदेव शिक्षण सस्था ही नेहमीच गोर गरीबांच्या सेवेत तत्पर असते . या सस्थेचे अध्यक्ष बाबुभाई परमार यानी काही विद्यार्थी शिक्षणा करिता दत्तक घेतले आहेत .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम