कोरोनाचा कहर ! औरंगाबादेत पुन्हा 7 पॉझिटिव्ह रुग्ण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 356 वर
- by Adarsh Maharashtra
- May 06, 2020
- 509 views
औरंगाबाद :- औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज सकाळीच शहरात कोरोनाचे 28 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर परत एकदा सात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं औरंगाबादेतील कोरोनाबाधित रुग्णांची एकूणच संख्या आता 356 वर पोहचली आहे.
दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळं शहरात मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नवीन आढळलेल्या या 7 रुग्णांमध्ये 4 रुग्ण संजयनगर, 2 रुग्ण भीमनगर, आणि 1 रुग्ण बायजीपुऱ्यातला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान आज दिवसभरात शहरात 35 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाल्यानं जिल्हा प्रशासनासमोरची चिंता आणखीच वाढली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम