मुंबईत अखेर मद्यविक्री बंद
- by Adarsh Maharashtra
- May 05, 2020
- 513 views
मुंबई : मुंबईत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सगळी दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. मुंबईत मद्यविक्रीही बंद करण्यात आली आहे. मुंबईतील अत्यावश्यक सेवांची दुकानं वगळता सर्व दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या गर्दीमुळे मद्याची दुकाने बंद करण्याची मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल केली होती. दरम्यान मद्यविक्रिची घाऊक आणि किरकोळ दुकानं बंद राहतील असंही सांगण्यात आलं आहे. काही वेळापूर्वीच हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने लॉकडाउन जरी १७ मेपर्यंत वाढवला असला तरीही काही प्रमाणात दुकानं उघडण्यासाठी सूट दिली होती. यामध्ये वाईन शॉप्स आणि इमारतीत असलेल्या दुकानांचे शटर वर गेले होते. मात्र आता नव्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांशिवाय सगळं काही बंद राहणार आहे.
मुंबईत करोना रुग्णांची संख्या १० हजारांचा टप्पा गाठू शकते. कारण मुंबईत आज आढळलेल्या करोना रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या ९ हजार ७०० च्या पुढे गेली आहे. गर्दी टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम