कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी बीकेसीत १००० खाटांचे रूग्णालयाचे काम युध्दपातळीवर सुरू -

मुंबई:कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी चीनच्या वुहान शहारात उभारण्यात आलेल्या कोविड१९ रुग्णालयाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने मुंबई येथील वांद्रे- कुर्ला संकुलात युद्धपातळीवर उभारण्यात येणाऱ्या १००० खाटांची क्षमता असलेल्या कोविड १९ रुग्णालयाच्या कामाला आज मुख्यमंत्री  उध्दवजी ठाकरे  यांची भेट 

येत्या १५ दिवसांत मुंबई येथील बी.के.सी. येथे १००० खाटांचे सर्व वैद्यकीय सुविधांनी सज्ज रुग्णालय उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  यांच्या आदेशावरून  तसेच मार्गदर्शना खाली उभारण्यात येणाऱ्या या महत्वाकांक्षी उपक्रमास आज स्वतः मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे  यांनी भेट देत जोमाने व युद्धपातळीवर सुरू असलेल्या या रुग्णालयाच्या कामाची पहाणी केली तसेच सर्व तज्ञ मंडळींसोबत चर्चा केली. ठाणे येथील ज्यूपीटर हाँस्पिटल व एमएमआरडीए यांच्या संयुक्त निदर्शनाखाली या रुग्णालयाची निर्मीती करण्यात येत आहे. याप्रसंगी परिवहन मंत्री अनिल परब सार्वजनिक बांधकामावर मंत्री . एकनाथ शिंदे  शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर एमएमआरडीए आयुक्त आर.राजीव आदी मान्यवर उपस्थित होते.



रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट