राज्यात कोरोनाचे २८१९ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आज ८४१ नवीन रुग्णांचे निदान;एकूण रुग्ण १५ हजार ५२५आरोग्यमंत्री राजेश टोपे
- by Adarsh Maharashtra
- May 05, 2020
- 636 views
मुंबई,दि.५:-राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ५२५ झाली आहे. आज ८४१ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३५४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २८१९ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८२ हजार ८८४ नमुन्यांपैकी १ लाख ६७ हजार २०५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १५ हजार ५२५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ९९ हजार १८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२ हजार ४५६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ३४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २६,पुण्यातील ६,औरंगाबाद शहरात १ तर कोल्हापूरमध्ये १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २४ पुरुष तर १० महिला आहेत. आज झालेल्या ३४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ३४ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये ( ८२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील:- (कंसात मृत्यूंची आकडेवारी)*
मुंबई महानगरपालिका: ९९४५ (३८७)
ठाणे: ८२ (२)
ठाणे मनपा: ४६६ (८)
नवी मुंबई मनपा: ४१५ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २२७ (३)
उल्हासनगर मनपा: १२
भिवंडी निजामपूर मनपा: २० (२)
मीरा भाईंदर मनपा: १८२ (२)
पालघर: ३१ (१)
वसई विरार मनपा: १६१ (४)
रायगड: ५६ (१)
पनवेल मनपा: १०७ (२)
ठाणे मंडळ एकूण: ११,७०४ (४१६)
नाशिक: २१
नाशिक मनपा: २७
मालेगाव मनपा: ३६१ (१२)
अहमदनगर: ४४ (२)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ४७ (११)
जळगाव मनपा: ११ (१)
नंदूरबार: १९ (१)
नाशिक मंडळ एकूण: ५७१ (३०)
पुणे: १०३ (४)
पुणे मनपा: १८३६ (११२)
पिंपरी चिंचवड मनपा: १२३ (३)
सोलापूर: ३
सोलापूर मनपा: १२७ (६)
सातारा: ७९ (२)
पुणे मंडळ एकूण: २२७१ (१२८)
कोल्हापूर: ९ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)
सिंधुदुर्ग: ३
रत्नागिरी: १० (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ६२ (४)
औरंगाबाद:३
औरंगाबाद मनपा: ३३७ (११)
जालना: ८
हिंगोली: ५५
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ४०५ (१२)
लातूर: १९ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २८ (२)
लातूर मंडळ एकूण: ५४ (३)
अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ५६ (५)
अमरावती: २ (१)
अमरावती मनपा: ५९ (९)
यवतमाळ: ९२
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: २४१ (१७)
नागपूर: २
नागपूर मनपा: १७९ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १८७ (२)
इतर राज्ये: ३० (५)
एकूण: १५ हजार ५२५ (६१७)
(टीप - ही माहिती केंद्र सरकारच्या कोविड१९ पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. सदरील अहवाल आय सी एम आर टेस्ट आय डी १२०३१७८ पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका आणि जिल्ह्यांचे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डेटा क्लिनिंग झाले असल्यामुळे प्रगतीपर आकडेवारीमध्ये वाढ आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या प्रगतीपर आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. आज राज्यात गेल्या २४ तासांमध्ये नव्याने ८४१ रुग्णांची नोंद झाली असून इतर १४३ रुग्ण डेटा क्लिनिंग प्रक्रियेमुळे वाढले आहेत
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ९४३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ११ हजार ६२९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५०.८१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम