चेंबूरच्या खारदेव नगरात परिसराबाहेरील बेवड्यांचा हैदोस! अंदाधुंद दगडफेकीत अनेकजण जखमी!

मुंबई (जीवन तांबे)राज्य शासनाने दारू विकण्यास सोमवार पासून परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात मात्र मंगळवारपासून दारूची दुकाने सुरू झाली. टाळेबंदी नंतर दारूची दुकाने सुरू झाल्याने तळीरामांनी लांबलचक रांगा लावून त्या मिळवल्या देखील मात्र सव्वा महिन्यानंतर दारू मिळाल्याच्या आनंदात अनेकांनी प्रमाणाच्या बाहेर दारू पियाल्याने त्याचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागले आहेत. चेंबूर येथील खारदेव नगर परिसरात काही बाजूच्या परिवारातील बेवड्यांनी येईन हैदोस घालून अंदाधुंद दगडफेक करून अनेक वाहनाची नासधूस केली तर यामध्ये काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 खारदेव नगर परिसरातील हनुमान सेवा मंडळ, दुर्गादेवी मैदान मार्ग या ठिकाणी आनंद नगर परिसरात राहणारे काही तरुण त्यांच्या ओळखीच्या मित्राच्या घरी दारू प्यायला बसले होते. त्यानंतर बाहेर येऊन दारूच्या नशेत केबिनला असलेले विजेचे मीटर फोडले. यावर न थांबता रस्त्यावर येऊन त्यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. हा सर्व प्रकार दुपारपासून सुरू होता. त्यांचा हा प्रकार वाढतच चालला होता. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या काही तरुणांनी त्यांना हटकले असता संध्याकाळी साडेसातच्या सुमारास या 10 ते 12 जणांच्या बेवड्यांनी अंदाधुंद दगडफेक करायला सुरुवात केली यामध्ये त्यांनी अनेक गाड्यांची तोडफोड केली. बंद दुकानांवर त्यांनी दगड फेकले तर पेव्हर ब्लॉक दुचाकींवर मारून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यामध्ये चार महिलांसह अनेकजण जखमी झाले आहेत. काहीजणांवर शताब्दी तर गंभीर जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती स्थानिक रहिवाश्यांनी दिली.

दरम्यान यातील बहुतेक तरुण बाजूच्याच आनंद नगरातील असून  या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट