लालबागचा राजा मंडळाने केली नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच WHO मान्यताप्राप्त मी मुंबईकर या संस्थेच्या वतीने जनता क्लिनीक अंतर्गत थर्मल स्कॅनर आणि ऑक्सिजन व्हॅन आज बळीराम क्रिडा मंडळ पटांगण, ग. द. आंबेकर मार्ग, आंबेवाडी, काळाचौकी परिसरातील नागरिकांची कोरोना पार्श्वभूमीवर मोफत तपासणी व समुपदेशन केले. यात नागरिकांना तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. या तपासणी शिबिरात नागरिकांना मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या रुग्णवाहिकेचे उद्घाटन आमदार अजय चौधरी, महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या हस्ते झाले. या कोरोनाच्या वैश्विक महामारीत  नागरिकांना आपल्या आरोग्याची तपासणी होऊन औषधोपचार व्हावा या हेतूने या मोबाइल रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले असून याचा उपयोग विभागातील नागरिकांना होत आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करावी असे आवाहन मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट