
वृत्तपत्रांचे अंक (पीडीएफ) व्हॉटसअप - टेलिग्रामवर पाठविल्याने कॉपीराईट कायद्याचा भंग होत नाही- ऍड. स्मिता चिपळूणकर माध्यम कायदेतज्ञ
- by Adarsh Maharashtra
- May 04, 2020
- 1865 views
सध्याचा काळ हा लॉकडाऊनचा काळ आहे. अशा संभ्रमाच्या परिस्थितीत अचूक व विश्वासार्ह बातम्या लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी आजही वृत्तपत्रेच अधिक विश्वासार्ह मनाली जातात. मात्र या संकटकाळी वृत्तपत्रांचे वितरण होणे कठीण होऊन बसले आहे. अशा वेळी इतर व्यवसाय उद्योगांप्रमाणेच लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाने देखील ऑनलाइन सुविधेचा आधार घेतला आहे.
● अनेक लहान मोठ्या वृत्तपत्रांचे अंक आज ई-पेपर स्वरूपात उपलब्ध आहेत. तिथे पीडीएफ डाऊनलोडची सुविधासुद्धा दिलेली आहे. अशा वृत्तपत्रांचे अंक व्हॉटसअप - टेलिग्रामवर पाठविल्याने कॉपीराईट कायद्याचा भंग होत नाही. त्यामुळे समोरचा संबंधितांवर कोणतीही कारवाई होण्याचा धोका नाही
● 'वृत्तपत्रांच्या पीडीएफ फॉरवर्ड करण्यावर इंडियन न्यूजपेपर सोसायटीने आक्षेप घेतला' असल्याचे नुकतेच वाचनात आले. असे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे साहजिकच सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता हा नियम संस्थेच्या सदस्यांना एकवेळ लागू पडू शकतो, मात्र सर्वसामान्य वाचकांना हा नियम लागू पडू शकत नाही.
● कोणताही वाचक हा वृत्तपत्रांच्या पीडीएफ फॉरवर्ड करू शकतो. फक्त त्याने पीडीएफमध्ये छेडछाड करू नये व त्यातील फोटो मास्क अथवा मॉर्फ करू नये. मजकुरात कोणताही बदल तसे पुनःप्रकाशन झाले नसल्यास तेथे कोणताही कायदा भंग होत नाही. अर्थातच गुन्हा दाखल होण्याची भीतीही नाही, असे माझे मत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम