दिवसभरात कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे सर्वाधिक १८ रुग्ण वाढले

कल्याण-डोंबिवली:महाराष्ट्रातला कोरोनाचा वेग कायम आहे. राज्यात आज ६७८ नवीन रुग्ण आढळून आलेत त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या १२९७४ एवढी झाली आहे. तर आज २७ रुग्णांचा मृत्यू झाला. आज ११५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. आतापर्यंत २११५ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. रुग्णांचा मृत्यू आटोक्यात आणण्यासाठी सरकार अटोकाट प्रयत्न करत असून अनेक उपाय योजना करण्यात येत असल्याची माहिती दिली जात आहे.

कल्याण-डोंबिवलीत आज कोरोनाचे सर्वाधिक १८ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीतील एकूण रुग्णांची संख्या २१३ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ६८ रुग्ण बरे झाले आहेत. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कल्याण-पश्चिम मधील ३, कल्याण पूर्व मध्ये३, डोंबिवली पूर्व मध्ये ५, डोंबिवली पश्चिम मध्ये २, टिटवाळा येथे ५ रुग्ण आढळले आहेत.

कल्याण- डोंबिवलीत रोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. महापालिकेनं १० हॉटस्पॉट जाहीर केले आहेत. तर १२२ पैकी २० प्रभाग संवेदनशील म्हणून जाहीर केले आहेत.

केडीएमसीतील हॉट स्पॉट

डोंबिवली पूर्व – म्हात्रे नगर, आयरे गाव, तुकाराम नगर, छेडा रोड

डोंबिवली पश्चिम – रेतीबंदर रोड, टेल्कोस वाडी

कल्याण पूर्व – चिंचपाडा, भगवान नगर

कल्याण पश्चिम – खडकपाडा, वायले नगर

संबंधित पोस्ट