जिल्हाधिकाऱ्याचा आदेशाला विलंब उल्हासनगरातील तळीरामांचे भंगले स्वप्न वाईनशाॅप बाहेर रांगाच रांगा

उल्हासनगर:   राज्य शासनाच्या  शिफारशी वरुन राज्य उत्पादन शुल्क विभागा कडून शहर आणि ग्रामिण विभागात काही अटी-शर्थींवर दारू विकण्यास परवांनगी दिली .दारुची दुकाने उघडतील या आशेने तळीरामांंनी सकाळ पासूनच वाईन शाँप समोर मोठी गर्दी केली होती.मात्र संबंधित जिल्हाधिका-यांचे अंतिम आदेश येण्यास विलंब झाल्यामुळे आज (काल) वाईन शाँप बंदच ठेवण्यात आल्यानं उल्हासनगरातील तळीरामांचे दारु विकत घेण्याचे स्वप्न भंगले आहे.


कोरोना  व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून, शहरात लाँकडाऊन सुरु करण्यात आले.त्यामुळे अत्याश्यक सेवा सोडून बाकी सर्व सेवा बंद करण्यात आल्या. गत ४०  दिवसांपासून शहरात बाकीच्या सेवा ठप्प आहेत. लाँकडाऊन कधी  उघडणार याकडं सर्वांचे  लक्ष लागलेलं असतांना,पुन्हा  लाँकडाऊनची मुदत वाढविण्यात आली.दरम्यान राज्य शासनाने राज्यातील काही भागात लाँकडाऊन शिथील  करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

यात दारु विक्रीचाही निर्णय घेण्यात आला.जिल्ह्यातील जी शहर प्रतिबंधक झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.तो भाग सोडून बाकीच्या भागात दारुची दुकानं , पान टप-या आदी. सेवा सुरु करण्याचा आदेश काढण्यात आला. त्यामुळे दारुबंदीच्या काळात चढ्या भावानं दारु विकत घेणा-या तळीरामांचा आनंद द्विगुणित झाला.तर काळाबाजार करणारे मात्र हिरमुसले.

दारुची दुकानं आज उघडतील या आशेने उल्हासनगरातील तळीरामांंनी सकाळ पासूनच दारुच्या दुकानां समोर लांबच लांब रांग लावल्या मात्र  याबाबतचा ठाणे जिल्हाधिका-यांचा अंतिम आदेश संबधित मनपा आयुक्तांना न आल्यानं शहरातील दारुची दुकानं बंद ठेवण्यात आली.त्यामुळे तळीरामांचे दारु विकत घेण्याचं स्वप्न भंगले आणि त्याना हातहालवत घरी जावं लागलं. आता दारुची दुकानं कधी उघडणार?की उघडणारच नाहीत?असा संभ्रम त्याचा मनात निर्माण झाला आहे.

संबंधित पोस्ट