लॉकडाऊन काळात दादर लोहमार्ग पोलिसांनी श्रमदानातुन रंगवले पोलीस स्टेशन!

मुंबई,:सध्या  महाराष्ट्र राज्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराचा  प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधक उपाय योजना अंतर्गत चालु असलेल्या लॉकडाऊन काळात .दादर रेल्वे पोलीस ठाणे मधील  पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी त्यांचे दैनंदिनी शासकीय कामकाजात मा.पोलीस आयुक्त  यांच्या मार्गदर्शनात विशेष कामगिरी योजना राबविली त्यात.

१)गुन्हे तपास निर्गती करणे

२)दाखल अपमृत्यु चौकशी निर्गती करणे

३)मुद्देमाल निर्गती करणे

४)प्रतिबंधक कारवाई प्रस्ताव पाठवने

या सोबत सर्व पोलीस आधिकारी व कर्मचारी यानी मिळून ठरवले कि संपुर्ण पोलिस स्टेशन आपण रंगवून स्वच्छ करुया.त्यानुसार पोलीस श्रमदानातुन व स्टेशनवर असणारे साफसफाई करणारे कर्मचारी यांच्या मदतीने संपुर्ण पोलिस  स्टेशन पांढऱ्या रंगाने रंगवुन घेतले सोबत जे जे स्कुल ऑफ आर्ट च्या विध्यार्थीनी काढलेले पोलिस चित्र त्यामुळे उठून दिसत आहेत.संपूर्ण पोलीस ठाणे सुशोभित करुन एक आगळा वेगळा संदेश दादर लोहमार्ग पोलीसांनी दिला

रिपोर्टर

संबंधित पोस्ट