
IFSC: १ मे २०१५'ला मोदींनी मुंबईचा प्रस्ताव फेटाळला, पण फडणवीसांची हिंमत नव्हती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण
- by Adarsh Maharashtra
- May 02, 2020
- 730 views
मुंबई,:-देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होण्याचं स्वप्न मोदी सरकारने गुंडाळलं आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच आयएफएससीचं मुख्यालय गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये होणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं असून याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट गिफ्ट सिटी आकारास येत आहे. त्यातच आता आयएफएससीचं मुख्यालय गांधीनगरला हलवल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासंबंधी (IFSC) भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कायम टीका करण्यासाठी काही लोकांना केवळ सोयीच्या गोष्टींचे स्मरण होते अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आपलं आपयश लपवण्यासाठी तसंच एकही दमडीचं काम केलं नाही हे लपवण्यासाठी मोदी सरकारवर आरोप केले जात असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
यूपीए सरकारच्या काळातील राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळेच मुंबईतील IFSC केंद्र गुजरातमध्ये गेले असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. २०१४ पर्यंत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचा प्रस्ताव हा केवळ चर्चेच्या पातळीवर होता. या काळात महाराष्ट्र, गुजरात आणि बंगळुरू या राज्यांकडून IFSC केंद्रासाठी प्रस्ताव पाठवण्यात आले होते.मात्र, २०१४ साली केंद्रात भाजपची सत्ता आली. यानंतर १ मे २०१५ रोजी मोदी सरकारने मुंबई आणि बंगळुरुचा प्रस्ताव फेटाळून IFSC केंद्र अहमदाबादच्या गिफ्ट सिटीमध्ये स्थापन करायचे ठरवले.त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एका शब्दानेही त्याला विरोध केला नाही. IFSC केंद्रावर मुंबईचा कशाप्रकारे नैसर्गिक हक्क आहे, हे त्यांनी मोदींना पटवून झाले नाही. कारण, त्यावेळी फडणवीस सरकारमध्ये मोदींसमोर काहीच बोलायची हिंमत नव्हती, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. यानंतर फडणवीसांनी केवळ एकदा विधानसभेत बोलताना मग आपण मुंबईत दुसरे IFSC केंद्र उभारू, अशी मोघम टिप्पणी केली. परंतु, २०१७ साली तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी या प्रस्तावाला स्पष्टपणे नकार दिला होता. पहिल्याच IFSC केंद्राची उभारणी झाली नसताना दुसऱ्या केंद्राचा घाट घालणे, हे व्यवहार्य नसल्याचे जेटलींनी त्यावेळी सांगितल्याची आठवण पृथ्वीराज चव्हाण यांनी करुन दिली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम