
मिडीया इम्पेक्ट :- अखेर त्या रेशन दुकानाचा परवाना निलंबित मात्र बेजबाबदार वक्तव्य करणारा आधिकारी अभिजित बोरोडेच काय ? दैनिक आदर्श महाराष्ट्रचा दणका
- by Adarsh Maharashtra
- May 01, 2020
- 1173 views
मुंबई प्रतिनिधी :गेल्या आठ दिवसापासून सोशल मीडियात आणि दैनिक आदर्श महाराष्ट्र वृत्त पत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा दणका मालाड पश्चिम रातोडीगाव येथील दुकान नीलिमा को ऑप सोसायटीतील रेशन दुकान क्रमांक ४२ग/१९४ या दुकानाचा अनागोदी कारभार तक्रारदार सुरेश वाघमारे यांनी उघडकीस आणला आहे या दुकानातून लोकांचे हक्काचे रेशन मिळत नव्हते दुकानदार कार्डधारकांना" लेना हैं तो लो नही तो मत लो अपना कार्ड दुसरे दुकान मे लेकरं जावं "असे उलटसुलट बोलत असे या पावती न देणे दर्शनी भागात दुकानातील नामफलक न लावणे ज्याचे पाच व्यक्ती असतील त्याना चारच व्यक्तीचे रेशन देणे मोफत तांदूळ नाकारणे असे प्रकार सदर दुकानदार करत असल्याचा प्रकार सुरेश वाघमारे यांनी कुठल्याही प्रलोभनास बळी न पडता अत्यन्त जगजाहीरपणे उघडकीस आणला तेंव्हा पासून काळाबाजारी करणाऱ्या रेशन दुकानदार व अधिकारी यांचे धाबे दणाणले असून या गंभीर प्रकरणाला दाबण्यासाठी या दुकानावर दिनांक २९ एप्रिल २०२० रोजी रेशन उपनियंत्रक सुहास शेवाळे कांदिवली विभाग यांनी निलंबनाची कारवाई केली व गेट क्रमांक ७आझमी नगर दुकान क्रमांक ४२ग/२९७ या ठिकाणी कार्डधारकांना रेशन मिळणार असल्याने रातोडी गाव येथील कार्डधारकांची जाणीवपूर्वक परवड होणार असून आझमी नगर येथील दुकान देऊन जनतेस जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचा प्रकार दिसतो या ऐवजी रातोडी गाव नजीक दुकान व्यवस्था करावी जेणे करून लोकांची ये जा करण्यास परवड होणार नाही याची दक्षता रेशन विभागाने घ्यावी असे वाघमारे यांचे म्हणणे आहे दुकानावर कारवाई करून आधिकारी मोकळे झाले हे सत्य आहे मात्र निरीक्षक अभिजित बोरोडेनी सुरेश वाघमारे यांना फ़ोन वरून "तुम्ही तुमचे रेशन जाऊन घ्या आणि केलेली तक्रार माघे घेऊन टाका तेंव्हा वाघमारे यांनी सष्ट शब्दात सांगितले हा माझा एकट्याचा प्रश्न नाही तर गरजु व सामान्य जनतेच्या वंचीत लोकांच्या समस्या आहेत तेंव्हा बोरोडेनी अगदी बेजबाबदारपणे केलेलं वक्तव्य तुम्ही तुमचं बघा हो लोकांचं नका सांगू " अशोभनीय व निषेधार्ह असून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे खरा काळाबाजार चालतो अशा अधिकाऱ्यास जरब बसने काळाची गरज आहे. करिता सुरेश वाघमारे यांनी शेवटी कोरोनाच्या प्राश्वभूमी मुळे आपल्या घरातच दिनांक १ मे २०२० रोजी अन्न त्याग आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते.मात्र लॉकडाऊन मध्ये प्रशासनाची होणारी दमछाक बघता स्थानिक मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदेव कालापाड यांच्या मध्यस्थीने तूर्तास अन्न त्याग आंदोलन पुढे ढकलण्यात आले असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या बेजबाबदार आधिकारी अभिजित बोरोडेवर प्रशासनाने त्वरित निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी तक्रादार सुरेश वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केली आहे या न्याय हक्कांच्या लोकलढ्यात राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे निकटवर्तीय अपंगाचे नेते रामदास खोत व फाईट फॉर राईट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप आदींनी पाठपुरावा केला असून मालाड कांदिवली विभागातून रेशन कार्ड धारकांच्या खूप तक्रारी येत आहेत याबद्दल लवकरच मोठे जन आंदोलन प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून उभारणार असल्याचे सुरेश वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे कळविले आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम