सहा वर्षीय मुलीची कोरोनाग्रस्तांसाठी मदत. खाऊचे दोन हजार रुपये आयुक्तांकडे केले सुपुर्द .

उल्हासनगर/ प्रतिनिधी    कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी उल्हासनगरातील एका सहा वर्षीय मुलीनं,खाऊसाठी वर्षभर जमवलेले दोन हजार रुपये महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे सुपुर्द केले.समृध्दी प्रदिप गोडसे असे या मुलीचं नाव आहे.तिच्या या दानशूरपणा बद्दल आयुक्तासह सर्वांकडून कौतुक होत आहे.

शहरात  कोरोना व्हायरस या महामारी आजाराने प्रवेश करताच,अश्या भिषण संकटाला तोंड कसे द्यायचे ?असा प्रश्न प्रशासना समोर निर्माण झाला.त्यात महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर.त्यामुळे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शहरातील धनधांडग्या नागरीकांना मदतीचं अव्हान केलं.आयुक्तांच्या या अव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला.यात एका सहावर्षीय मुलीनं आपलं योगदान दिलं आहे.

उल्हासनगर कँम्प - ४ लालचक्की परिसरात गोडसे परिवार  राहातो.प्रदिप कारभारी गोडसे हे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत.तसं हे कुटुंब सामान्य. घरातच  सतत कोरोना  व्हायरस आजारा बाबत चर्चा,वडीलांची मदतीसाठी धावपळ. हे सगळं समृध्दी शांतपणे बघत होती.मी ही काही मदत करु शकते का? असा बाळबोध प्रश्न तिनं आपल्या आजोबांना विचारला. याच घरातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं.

दोन दिवसां पुर्वी तिनं आपली पिगिबँग तिच्या वडीलांना आणून दिली.हि बँग साहेबांना द्या, असे सांगितले. याप्रसंगानं प्रदिप गोडसे भारावून गेले. त्यांनी पिगिबँगसह मुलीला उचलले  आणि महापालिका गाठली. आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेतली.त्याच्या मुलीने आपली पिगीबँग आयुक्तासमोर फोडली.त्यातील सर्व पैसे आयुक्तांना दिले.हि सर्व रक्कम २,६८३/- रु. होती.समृध्दीच्या या दानशूरपणाचं आयुक्तांनी तोंडभरुन कौतुक केले.शहरातील तरुण पिढीनं असा विचार केला तर आपलं शहर,राष्ट्र,आणि देश समृध्द होण्यास वेळ  लागणार नाही.असा विश्वास व्यक्त केला.

संबंधित पोस्ट