ऋषि कपूर यांच्या निधनानंतर सिनेसुष्टिवर शोककळा

सुतारकाम करणा-या पिंपळकर यांनी व्यक्त केला शोक

मुंबई(शांताराम गुडेकर /महेश अनभवणे)चेंबूरचा आर,के स्टूडियो व कपूर फॅमिली म्हणजे आम्हा कामगारांचे आपुलकीचे घर राज कपूर यांच्यापासून सार्वजनिक गणेशोत्सव व होळी हे पारंपारिक सण चालू करण्यात आले राज कपूर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र रणधीर कपूर,राजीव कपूर,ऋषि कपूर यांनी ही परंपरा अखंडित सुरु ठेवली त्यात ऋषि कपूर हे आम्हा कामगारांची आस्थेने विचारपूस करायचे मी वयाच्या १८ व्या वर्षापासून स्टूडियो मधे गेली ४५ वर्ष सुतार म्हणून काम करायचो ऋषि कपूर व त्यांच्या मातोश्री कृष्णा कपूर ह्या घरचे काही फर्नीचर चे काम असेल तरी   'सदा ये काम तुम ही करो, असे सांगायचे बाहेरगावी चित्रपटाच्या चित्रिकरण्या दरम्यान आम्हा सर्व कामगारांची विशेष काळजी ऋषि कपूर घ्यायचे वैद्यकिय मदत काही अडचण असल्यास आम्हाला तातडिने मदत करीत असत यावर्षि या स्टूडियोची संपूर्ण जागा गोदरेज या नामवंत विकासकाने विकत घेतली तरी आम्हा सर्व कामगारांची संपूर्ण देनी ऋषि कपूर यांनी देवू केली सन २०१९ च्या आर.के.स्टुडिओच्या शेवटच्या गणेशोत्सवा दरम्यान ऋषि कपूर यांनी गणेशाचे दर्शन घेतले व भावुक होवून सर्व कामगारांना अभिवादन करुन पुढील उपचारासाठी परदेशी रवाना झाले तेव्हा आम्हा कामगारांना समजले की साहेबांना कॅन्सर या दुर्धर आजार झाला आहे व त्याच्याशी ते लढ़ा देत आहेत आज ऋषि कपूर साहेब आमच्यात नसून आमच्या घरातील माणूसकीतिल माणूसपण जपणारा सदत्य निघून गेल्याची खंत जाणवत आहे.

सदानंद भीकाजी पिंपळकर कारपेंटर, आर.के.स्टूडियो

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट