विद्यार्थी पालक शिक्षकांसाठी अभियान; घरी बसून होऊ शकतात सहभागी

मुंबई(शांताराम गुडेकर/ प्राजक्ता अरुण चव्हाण)  कोरोना जनजागृती प्रश्नमंजुषा अभियानात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक घरी बसून होऊ शकतात सहभागी असेच एक छोटेसे जनजागृती अभियान म्हणून बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या संस्थेच्या अंतर्गत चालविले जाणारे नियतकालिक जीवन गौरवच्या वतीने"कोविड-१९ जनजागृती मोहीम" संदर्भात ही लिंक-https://forms.gle/B3PzvKCifSu2LrE48 या लिंकद्वारे ऑनलाइन प्रश्नमंजुषा तयार करण्यात आली असून राज्यभरातील विद्यार्थी पालक - शिक्षक, नागरिक कोरोना जनजागृती प्रश्नमंजुषा अभियानात सहभागी झाल्यावर प्रत्येकाला मेल वरती निकाल व प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध होतात. या अभियानाची लिंक तंत्रस्नेही शिक्षिका मालेगावचे वैशाली भामरे, नाशिकचे वैभव शिंदे आणि औरंगाबादचे रामदास वाघमारे यांनी तयार केली आहे. राज्यभरातील पन्नास ते साठ हजार नागरिक सहभागी होऊन कोरोना जनजागृती - प्रश्नमंजुषा सोडून प्रमाणपत्र मिळू शकतात. आत्तापर्यंत राज्यभरातील दोन हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्रात कोविड-१९ या आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवनगौरव मासिक हे राज्यभरातील लॉकडाऊनच्या कालावधीत विविध उपक्रम राबवित आहे. आपली सामाजिक जबाबदारी म्हणून जनजागृती अभियान राबून शासनाला एका अर्थाने सहकार्य करत आहेत.या अभियानातून राज्यभर जनजागृती होत आहे. या अभियानात वैशाली भामरे ,वैभव शिंदे, रामदास वाघमारे ,डी.बी शिंदे ,डॉ. रत्ना चौधरी , मु.अ.संदीप सोनवणे , मीरा वाघमारे इत्यादी राज्यभर अभियान राबवित आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट