
उल्हासनगरात कोरोना मुळे ८७ वर्षिय महिलेचा मृत्यु
- by Rameshwar Gawai
- Apr 29, 2020
- 647 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ३ येथिल फालवर लाईन येथे राहणाऱ्या ८७ वर्षिय महिलेचा कोरोनाने मृत्यु झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली असुन ती महिला उल्हासनगर महापालिकेतील सेवा निवृत्त कर्मचारी आहे . तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरातील चिंतेत भर पडली आहे
उल्हासनगर कॅंप ३ येथिल फालवर लाईन विभागात राहणारी ८७ वर्षिय महिला हिचे २७ एप्रिल रोजी निधन झाले होते . तिच्या कोरोना टेस्ट साठी नमुने घेन्यात आले होते . आणि ते नमुने एका खाजगी प्रयोग शाळेत तपासणी करिता पाठविले होते . दरम्यान २९ एप्रिल रोजी तिच्या कोरोना टेस्ट चाचणी पॉझिटिव्ह आली आहे .त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे . तर रुग्ण वाढत असल्याने शहराच्या चिंतेत वाढ झाली आहे . सदर महिला ही उल्हासनगर महापालिकेतील सेवा निवृत्त कर्मचारी आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम