मालेगावात करोनाचा उद्रेक रुग्ण संख्या १८२ वर ८४ रुग्णांचा अहवाल प्राप्त

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ५ पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी

नाशिक /मालेगाव( प्रतिनिधी )-  मालेगाव शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून आज बुधवारी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार ११ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काल एकाच दिवशी ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते.

आज एकूण ८४ अहवाल प्राप्त झाले असून यातील ७३ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असून उर्वरित ११ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८२ वर गेली असून यातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज बुधवार दि.२९ रोजी सायंकाळी ८४ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यातील ७३ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ११ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. या रुग्णांमध्ये ५ पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी व राज्य राखीव दलाच्या एका जवानाचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काल मंगळवारी आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये देखील ३ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश होता. बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना करोनाची बाधा होत असल्याने चिंता वाढली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट