
उल्हासनगर कँप ३ मधिल क्रिटिकेअर हाँस्पिटलची अक्षम्य बेफिकीरी .पी पी ई कीट फेकली रस्त्यावर .
- by Rameshwar Gawai
- Apr 29, 2020
- 643 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : सध्या कोविड १९ चा संसर्ग रोखण्यासाठी सर्व शहराची शहर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहेत. यातील महत्त्वाचा दुवा असणाऱ्या रुग्णालयं देऊळं आणि डॉक्टर देवांची भुमिका निभावतायेत. परंतु उल्हासनगरात मात्र, एका खाजगी दवाखान्याने मात्र बेफिकीरीने स्वच्छतेचे तीन तेरा वाजवले आहेत. यामुळे कोरोनाच्या अशा भयंकर परिस्थितीत
संक्रमणाच्या संशयीत धोक्याने उल्हासनगर वासियांच्या चिंतेत भर टाकली आहे .
उल्हासनगर कॅम्प . ३, मधील क्रिटीकेअर या खासगी रुग्णालयाने रुग्ण तपासणी व चिकित्से वेळी स्व संरक्षणात्मक कवच म्हणून वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावर टाकली आहे . रुग्णालयाने यावर
कोणतीही जैविक प्रक्रिया न करता ही किट रस्त्यावर फेकून दिल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या या किटचे फोटो सामाजिक कार्यकर्ते संदेश मुकणे व पत्रकार दिलीप मालवणकर यांनी समाज माध्यमातुन व्हायरल केले होते. याची दखल घेता महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित डॉक्टरांना वर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र रुग्णालयांनी अशा प्रकारे टाकाऊ वैद्यकीय साहित्य निष्काळजीपणाने उघड्यावर सर्रासपणे फेकल्यामुळे अशा रुग्णालयांची विश्वासार्हता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम