
उल्हासनगरात कोरोनाच्या रुग्णात वाढ . पोलिस दलात असलेल्या पोलिसाचे कुटुंब ही पॉझिटिव्ह .
- by Rameshwar Gawai
- Apr 29, 2020
- 564 views
उल्हासनगर / प्रतिनिधी ; उल्हासनगर शहरात कोरोनाच्या रुग्णात वाढ झाली असुन एकुण आता सात रुग्ण झाल्याने शहरातील नागरिक भयभित झाले आहेत . कॅंप ४ येथिल संभाजी चौकातील जिजामाता कॉलनीत राहणाऱ्या व मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसाच्या परिवारातील चार सदस्याचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत . त्याना आता उल्हासनगर कॅंप ४ येथिल कोविड १९ रुग्णालयात उपचारा करिता दाखल केले आहे . तर या रुग्णालयात एकुण नऊ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत .
उल्हासनगर कॅंप ४ येथिल संभाजी चौकातील जिजामाता कॉलनीत राहणारा एक व्यक्ती मुंबई पोलिस दलात कार्यरत होता . त्याची ड्युटी गोदीच्या येलो गेट वर होती . पण तो अधुन मधुन घरी येत होता दरम्यान तो कोरोना बाधित झाल्याने त्याची तपासणी करन्यात आली होती . त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला उल्हासनगर कॅंप ४ येथिल कोविड १९ रुग्णालयात उपचारा करिता दाखल करुन त्याच्या परिवारातील चार सदस्याना क्वारंटाईन करन्यात आले होते . तर त्या चार ही जणाची कोरोना टेस्ट केली होती तेव्हा त्यांचा तपासणी अहवाल देखिल पॉझिटिव्ह आला आहे . तेव्हा त्या पोलिसांच्या चार ही सदस्याना कोविड १९ रुग्णालयात उपचारा करिता दाखल केले आहे . तर आता उल्हासनगर येथिल कोविड १९ रुग्णालयात ९ रुग्ण उपचार घेत आहेत . दरम्यान या रुग्णालयात ५० बेड ची व्यवस्था असुन चार व्हेंटिलेटर आहेत . बदलापुर येथिल रुग्ण देखिल याच रुग्णालयात उपचार घेत आहेत . मात्र उल्हासनगरात एकुण सात कोरोना बाधित रुग्ण झाल्याने शहरातील नागरिक भयभित झाले आहेत . दरम्यान कॅंप ४ येथिल संभाजी चौक ते जिजामाता कॉलनी परिसर पोलिसानी सील केला आहे . कोरोनाला हरविन्यासाठी नागरिकानी बाहेर पडु नये आवाहान आयुक्त सुधाकर देशमुख यानी केले आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम