पूर्व द्रुतगती मार्गावर अपघात त्यातत एकाचा मृत्यू ट्रकचालकचा विरोधात गुन्हा दाखल.
- by Adarsh Maharashtra
- Apr 29, 2020
- 576 views
मुंबई :( जीवन तांबे )पूर्व द्रुतगती मार्गावर सध्या मुंबईबाहेर आपल्या मूळ गावी परत कामगार मजूर जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत अशा परिस्थितीत मंगळावर ता. 28 एप्रिल रोजी भांडुप येथे पूर्व द्रुतगती मार्गावर एका इसमाला भरधाव ट्रेलरने उडविण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
धक्कादायक म्हणजे दुपारच्या सुमारास ज्यावेळी हा अपघात झाला. त्यावेळी या मार्गावरून ठाण्याच्या दिशेने अनेक वाहने जात होती. परंतु एकाही वाहन चालकाने रस्त्याच्या मधोमध पडलेल्या इसमाची मदत केली नाही 15 ते 20 मिनिटे हा मृतदेह रस्त्याच्या मधोमध पडून होता. त्यानंतर एका दुचाकीस्वाराने यासंदर्भातील माहिती पोलिसांना कळविली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला आहे. विक्रोळी पोलिसांनी ट्रक चालकाचा विरोधात गुन्हा दाखल केला असून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम