कोरोना मुक्तीचा मार्ग 'वरळी पॅटर्न'
- by Adarsh Maharashtra
- Apr 29, 2020
- 883 views
मुंबई-रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे गेल्या काही दिवसांपासून ‘वरळी’ हे नाव मुंबई आणि राज्यात गाजत आहे. मात्र जितक्या वेगाने इथली रुग्णसंख्या वाढते आहे, तितक्याच वेगाने रुग्ण बरे होत आहेत आणि नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटते आहे. केंद्र सरकारच्या पाहणी पथकाने वरळी कोळीवाडय़ात पालिका अधिकाऱ्यांनी राबवलेल्या ‘वरळी कोळीवाडा पॅटर्न’चे कौतुक केले आहे. त्याचबरोबर वरळीच्या ‘एनएससीआय’मध्ये उभारलेले अलगीकरण केंद्रही आता देशासाठी कुतुहलाचा विषय ठरले आहे.
वरळी कोळीवाडा प्रतिबंधित केल्यानंतर येथील लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवणे हे एक मोठे आव्हान होते. या परिसरात लोकांना घरोघरी दूध, किराणा माल, सिलिंडर पुरवण्यासाठी पालिकेने कर्मचाऱ्याची फौज तयार केली. कोळीवाडय़ाचे २४ भाग करून त्यात नियोजन करून हे काम केले गेले. दररोज रहिवाशांची तापाची तपासणी केली गेली. वरळी परिसरात आतापर्यंत १ लाख लोकांची तपासणी करण्यात आली. त्यातून लक्षणे असलेल्या ४०० लोकांना वेगळे करण्यात आले. पोद्दार रुग्णालय, कोळी समाज भवन या ठिकाणी विलगीकरण केले. तर ज्यांच्या घरी शौचालयाची सुविधा आहे अशा ११७५ लोकांना घरातच विलग ठेवण्यात आले.
वरळी विभागाचे आमदार व राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ असून त्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत काम करून येथील जनतेची वाहवा मिळविली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम