मुंबईमधून तासगांवमध्ये विनापरवाना येणाऱ्या त्या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल... !

तासगाव :- मुंबई पोलिसामध्ये कार्यरत असलेली महिला पोलिस एका भाजीपाल्याच्या वाहनातून मुंबईमधून तासगाव (जि. सांगली) येथे विनापरवाना आली. याप्रकरणी संबंधित पोलिस  महिलेवर विनापरवाना तसेच संचारबंदी भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या महिलेला इन्स्टिट्यूशनल क्वांरटाईन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत तासगाव तालुक्‍यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

मुंबई पोलिसमध्ये एसआयटी पथकात नियुक्तीवर असलेली ही महिला पोलिस काल एका भाजीपाल्याच्या वाहनातून विटा आणि तेथून तासगाव वृन्दांवन कॉलनी येथे आल्याची माहिती तासगाव पालिका प्रशासनाला मिळाली. पालिका पथकाने त्वरित धाव घेऊन ही माहिती पोलिस आणि ग्रामीण रुग्णालयाला दिली.

दरम्यान, ही माहिती मुंबईहून जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षालाही मिळालेली होती. ही माहिती मिळताच तातडीने वैद्यकीय पथकाने तपासणी करून मिरज येथे पाठविण्यात आले. तेथे स्वॅबचा नमुना घेण्यात आला असून, या महिला पोलिसला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. तासगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तासगाव शहरातील 24 जणांना यापूर्वी होम क्वारंटाईन करण्यात आले होते, तर शहरातील 1 जणाला इन्स्टिट्यूशनल क्वांरटाईन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत पुन्हा तासगाव तालुक्‍यात येणाऱ्याची संख्या वाढली आहे. अनेकदा आपल्याकडे आलेल्यांची माहिती नातेवाईक देताना दिसत नाहीत, मात्र त्यामुळे धोक्‍याची घंटा वाजू लागली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट