मुंबईत कोरोना संकटाच्या लढाईत काम करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे संरक्षण ! कामगार दहशतीत!
- by Adarsh Maharashtra
- Apr 28, 2020
- 691 views
मुंबई; ( जीवन तांबे )मुंबई शहरात कोरोना संकट उभे राहिले असताना पालिका प्रशासन अनेक उपाय योजना करीत आहे .मात्र पालिकेचे आत्यावश्यक सेवेतील सफाई कामगार, शौचालय कामगार असुविधानी भयभीत झाले असून आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रक नुसार कोणतेही मोबदला मिळत नसल्याचा आरोप कामगार युनियनने केला आहे.
मुंबई शहरात कोरोनांने थैमान घातला आहे. या कोरोनाला लढा पालिका कर्मचारी जोमाने देत असताना या साफसफाई कामगार तसेच शौचालय साफ करणाऱ्या कामगारांना मास्क निकृष्ठ दर्जाचे देण्यात आले आहेत. साफसफाई करताना औषध फवारणी, मास्क, हँड ग्लोज घालून काम करावे लागत आहे. त्यांना कोणतेही संरक्षण किट देण्यात आली नसल्याने त्याच परिस्थितीत काम करावे लागत आहे.
रिलायन्स कंपनीच्या तर्फे या कोरानाच्या विरोधात लढा देणाऱ्या पालिका कामगारांना प्रोत्साहन 1500 रुपयांचे घरगुती सामान भरण्याचे कुपन काही ठिकाणी देण्यात आले आहे. मात्र एम पश्चिम विभागात अद्याप देण्यात आलेले नसल्याने कामगार नाराज झाले आहेत. यातच पालिका आयुक्त यांनी एक परिपत्रक काढून कामगाराना दरदिवसाचा प्रवास भत्ता म्हणून 300 देण्यात यावा असे आदेश असतानाही अद्याप त्यांच्या पर्यत पोहचले नाहीत. कामाच्या ठिकाणी कामगारांना खाण्याची, पाणी पिण्याची सोय नाही. मास्क निकृष्ठ दर्जाचे देण्यात आले आहे. अशीच परिस्थीती टीबी सोसायटीच्या विविध विभागातील कंत्राटी कामगारांची झाली आहे. झोपडपट्टीत जाऊन क्षय रुग्णांना गोळ्या द्याव्या लागत आहे. या टीबी सोसायटीतील दोन हेल्थ व्हिजिटरला तर कोरोनाची लागण झालेली असल्याने तेही भयभीत झाले आहेत . एक एक महिन्याचे रुग्णांना औषधे देऊन सुद्धा दरदिवशी कामावर हजर रहावे लागत आहे.
आरोग्य सेविका ही कोरोनाच्या विरोधात चाचण्या व नागरिकांच्या तपासणीसाठी मैदानात उतरले आहेत. सर्व कायम स्वरूपी कंत्राटी कामगार जोखमीची सेवा बजावत असून त्यांना कोणताही भत्ता पालिकेतर्फे दिला जात नाही काही विभागात भत्ता सुरू केला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कीटकनाशक विभागातील फवारणी करणारे कामगार, घनकचरा साफसफाई, कंत्राटी कामगार आपल्या जीवावर उदार होऊन काम करत आहे.
या कामगारांना त्यांच्या सेवेचा मोबदला मिळावा तसेच रिलायन्स कुपन, उत्तम दर्जाचे मास्क, संरक्षक किट देण्यात यावे
अशी मागणी मुन्सिपल मजदूर युनियनचे पदाधिकारी संदीप मोते,शक्तीवेल कलवन,अमित जाधव यांनी केली आहे.
प्रतिक्रिया- शशांक राव
( नेते- पालिका कर्मचारी मुन्सिपल लेबर युनियन )
पालिका आयुकता कडे पत्रव्यवहार करून अद्याप साफसफाई कामगार, इतर आरोग्य विभागात काम करणाऱ्या कंत्राटी, साफसफाई कामगाराना मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटाझर, संरक्षक किट देण्यात मागणी गेल्या दोन महिन्यांपासून करीत आहोत. अद्याप देण्यात आलेले नाही. पालिकेने कोरोनाच्या भयाण परिस्थितीचा विचार तरी कामगारांची काळजी घेतली पाहिजे. परन्तु ती घेताना दिसत नाही. त्यामुळे पालिका कामगार कोरोना बळी पडताना दिसत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम