म्हात्रे नगरचे नगरसेवक मुकुंद(विशु) पेडणेकर यांचे प्रभागात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

डोंबिवली - (प्रदिप मस्तकार ) डोंबिवली शहरातील म्हात्रे नगर प्रभागाचे नगरसेवक श्री.मुकुंद (विशु) बा.पेडणेकर यांनी लॉक डाऊन काळात प्रभागातील ५३० हुन अधिक आर्थिकदृष्ट्या दुर्बळ तसेच गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले. अनेक नागरिकांनी लाभ घेतला. म्हात्रे नगर प्रभागात लॉक डाऊन अतिशय प्रभावीपणे व कठोररीत्या राबविले जात असल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे अशा वेळी नगरसेवक विशू पेडणेकर हे त्यांच्या मदतीसाठी धावून आले व त्यांनी अनेक लोकांना जीवनावश्यक वस्तू वाटल्या. नगरसेवक पेडणेकर हे  धडाडीचे नगरसेवक मानले जातात. रात्री-अपरात्री नागरिकांच्या सेवेसाठी धावून येणे हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. विभागातील नागरिक कधीही त्यांना कामासाठी बोलवतात आणि ते  रात्री अपरात्री धावत  येतात. कधीही त्यांनी आपली जबाबदारी टाळलेली ऐकिवात नाही. प्रभागातील नागरिकांसाठी विशू पेडणेकर हे नगरसेवक म्हणजे परवलीचा शब्द झालेल्या आहे. कुठल्याही कामासंदर्भात विशू पेडणेकर यांनी कधीही टाळाटाळ केलेली नाही. प्रत्येक नागरिकांचे काम ते स्वतः आवडीने करतात. पहिल्या दिवसापासून नगरसेवक पेडणेकर आपल्या सहकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करताना दिसत आहेत. तसेच या प्रभागातील गुरुवायूर मंदिर ट्रस्ट , प्रभागातील सेवाभावी नागरिकांच्या आर्थिक सहकार्याने व भा. ज.पा.वॉर्ड क्र.६७ म्हात्रे नगर मधील सर्व कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे सदर मदत गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात आली. कुठलाही गाजावाजा न करता कामाचे नियोजन करून ते आपले काम चोखपणे करीत आहेत.

तसेच कांद्याची वाढती किंमत विचारात घेऊन प्रभागातील साईनाथवाडी सेवा वस्ती मध्ये ३५० किलो कांदे वाटप करण्यात आले. विभागातील गरजू नागरिकांना काय हवे काय नको त्याची ते स्वतः जातीने चौकशी करून त्यांच्यापर्यंत वस्तू पोहोचवीत आहेत. अनेक कार्यकर्त्यांची त्यांना लाभलेली मोलाची साथ हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. स्वतः अलिप्त राहून मदत योग्य जागेवर पोहोचते की नाही यावर त्यांचे जातीने लक्ष असते.
 प्रभागातील सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या तरुणांच्या सहकार्याने रोटी बँक ही संकल्पना राबवून दररोज प्रभागातील नागरिकांच्या सहकार्याने १५००  ताज्या चपात्या जमा करून त्या भुकेल्या ,गरीब लोकांना वाटल्या जातात.सादर उपक्रम हा प्रभागातील जसमीन शाह आणि मित्र मंडळींच्या सहकार्याने आत्तापर्यंत यशस्वी रित्या राबवित आहे. नागरिकांच्या सोयीकरता त्यांनी काही उपक्रम हाती घेतलेले आहेत. नगरसेवक श्री.मुकुंद (विशु) बा.पेडणेकर यांनी महापालिकेतर्फे  लॉकडाऊन कालावधीत नेमलेले खालील स्वयंसेवक असून नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा.

1) श्री.मुकुंद(विशु) बा.पेडणेकर :9867628138
2)श्री.अमित कासार:9029110443
3)श्री.दिनेश चोरगे:8082330885
4)श्री.योगेश पवार:98190254593
5)श्री.निकेश साटम:9082086386
6)श्री.चैतन्य कदम:  7021153991
7)श्री.दुर्गेश्वर कानोजिया:9076205556
8)श्री.जसमीन शाह: 8980723350
9)श्री.स्वप्नील कांबळे: 9594997989
10)श्री.मंगेश मांडवकर : 8879320551
11)श्री.ओंकार चोरगे: 8655800345
12)श्री.संतोष(बाबू) देसाई : 9820061556
13)कु.निखिल नारकर : 9082020718 

वरील स्वयंसेवक हे प्रभागातील दुकानदाराकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यास आपल्या सोसायटी अथवा इमारती पर्यंतच सेवा देतील तेथून आपल्या घरापर्यंत आपली डिलिव्हरी नागरिकांना स्वतः घेऊन जावी लागेल याची नोंद घ्यावी. ह्या आलेल्या खडतर संकटात नगरसेवक विशु पेडणेकर हे असेच सेवाभावी काम करोत अशी भावना नागरिकांनी प्रतिनिधीशी बोलून दाखविली खूप चांगले काम विशू पेडणेकर करत आहेत असेही त्यांनी सांगितले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट