
शिधावाटप दुकानातील गैर कारभारावर कारवाई करण्याऐवजी तक्रारदारावर तक्रार मागे घेण्यासाठी अधिकाऱ्याचा दबाव
- by Adarsh Maharashtra
- Apr 22, 2020
- 1000 views
मुंबई.(प्रतिनिधी)दि21/4/2020 रोजी अन्यायावर सडेतोडपणे प्रहार करणारे अल्पावधीतच वाचकांच्या गळयातील ताईत झालेले "दैनिक आदर्श महाराष्ट्र" ने प्रसिद्ध केलेल्या बातमीचा धसका घेतं प्रशासन खडबडून जागं झालं ते खर मात्र अजूनही गेंडयाची कातडी पांघरलेल्या भ्रष्ट दुकानदारांचे निर्गठ अधिकारी वर्गाचा आशीर्वाद असेल तर काळाबाजार करणारे सुधारणार तरी कसे असाच प्रकार मालाड पश्चिम, राठोडी व्हिलेज, नीलिमा को.ऑप.सोसा.मधील शिधावाटप दुकान क्र.४२ ग १९४ या दुकानात राजरोसपणे चालू आहे या दुकानात मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याची तक्रारी रेशन धारकांकडून करण्यात येत होत्या. तसेच अनेक वेळा जाणूनबुजून दुकानदार दुकान बंद ठेऊन कारण लोक येऊन कंटाळून परत जावे हाच दुकानदारांचा उदैश असून अनेक रेशनधारकाना अन्नधान्य देत नाही शासनाने सांगितल्या प्रमाणे फलक दर्शनी भागात नसून अन्य ठिकाणी रेशनधारकांना मालाची पावती देत नाही रेशनधारकांना मोफत मिळणारे तांदूळ मिळत नसल्याच्या तक्रारी दुकानदाराच्या तक्रार वही मध्ये रेशनधारकांनी केली आहे. पण त्या वहीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
लॉकडाऊनच्या बिकट काळात कोरोनाच्या महामारीत अशा प्रकारे नागरिकांची खुल्लेआम फसवणूक करत काळाबाजार करणाऱ्या दुकानदारावर त्वरित कारवाई करून नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी फाईट फॉर राईट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या कडे ट्विटर च्या माध्यमातून तक्रार केली होती
याबाबत दि.21एप्रिल रोजी दैनिक आदर्श महाराष्ट्र मध्ये बातमी प्रसिध्द होताच प्रशासन जागे झाले व अन्न पुरवठा मंत्री मा. छगन भुजबळ यांच्या कार्यालयातून अनिल सोनवणे यांनी वाघमारे यांना फोन करून तुम्ही दिलेल्या तक्रारींवर उपनियंत्रक शेळके हें पुढील योग्य ती चौकशी करतील तेंव्हा शिधावाटप कार्यालय ४२ ग मधील शिधावाटप निरीक्षक अभिजीत बोरोडे यानी वाघमारे यांना कॉल करून तुम्ही तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड घेऊन जावा मी दुकानदाराला तुम्हाला शिधावाटप करायला बोलतो तेंव्हा वाघमारेंनी तुम्ही स्वतः चौकशीला या असे सांगितले व माझाच एकट्याचा प्रॉब्लेम्स नाही तुम्ही या विभागातील खुप शिधाधारकांना रेशन देण्यास मनाई केली आहे तर बोरोडे बोलले ठीक आहे मी येतो जेव्हा वाघमारे काही शिधाधारकांना घेऊन पोहाचले तेंव्हा दुसऱ्याचं शिधाधारकांचा विषय सोडा मी तुम्हाला देतो आणि तुम्ही तक्रार वर लिहा मला माझे राशन मिळाले माझी काहीही तक्रार नाही तेंव्हा वाघमारेंनी नकार देत रीतसर कारवाई करा बाकी लोकांचे पण मिळाले पाहिजे म्हणून आता काय करू सांगा तेंव्हा तुम्ही जावा आता असे बोरोडे यांनी बोलले व याबाबत कारवाई करण्यासाठी आलेल्या बोरोडेनी फक्त दुकानदाराची बाजू मांडली तेंव्हा सोबत आलेले काही महिला व कार्ड धारक सुद्धा निराश होऊन माघारी आले परंतु बोरोडे हे काळाबाजार करणाऱ्या दुकान दारावर कारवाई करण्या ऐवजी याबाबत तक्रार करणाऱ्या सुरेश वाघमारे यांना फोन करून तक्रार मागे घेण्यासाठी सांगतात. हा किती संतापजनक प्रकार असून एकीकडे काही संस्था संघटना मोफत धान्य वाटप करून लोकांची उपासमार टाळत आहे व हे अधिकारी व दुकानदार सरकारकडून आलेले हक्काचे रेशन देण्यास मुजोरी करीत आहेत वाघमारे यांनी तक्रार मागे घेण्याचे नाकारले असता त्यांना दुकानावर बोलावून " तुम्ही तुमच बघा, मी दुकानदाराला तुम्हाला रेशन देण्याचे सांगतो" असे बोरोडे यांनी वाघमारे याना सांगितले तेंव्हा यापूर्वी का देण्यास नकार दिला तेंव्हा नियमात बसत नव्हते म्हणून दिले नाही आता रीतसर तक्रार केली तर नियमात बसलो का ?? असा संतप्त सवाल सुरेश वाघमारेनी विचारला व माझ्या सारख्या अनेक लोकांना रेशन मिळत नाही तरी आपण याबाबत ह्या काळाबाजार करणाऱ्या दुकान दारावर कारवाई का करत नाहीत मात्र अधिकारी बोरोडेनी नंतर बघू म्हणून टोलवाटोलवी करीत वाघमारे यांनी केलेल्या विंनतीला अद्याप तरी मिलीभगत असल्यामुळे कारवाई केली नाही फक्त देखल्या देवास दंडवत केल्यासारखे दुकानदारला तू पावती दे अभी तेंव्हा दुकानदार हाजी हाजी बोलत होता मात्र आजपर्यँत कुणालाच पावती दिली नाही व राशन वाटपात हेराफेरी केली व सर्रास पणे काळ्याबाजारात गरिबांचे राशन विक्री करीत आहे बोरोडे सारखे दुकानदारांचे पाठीराखे असेल तर अशा दुकानदारांचे राज्य चालेलच एक जबाबदार अधिकारी बेजबाबदार कसा बोलू शकतो तुमचं बघा लोकांचं नका सांगू मात्र वाघमारेंनी सर्वांचं राशन द्या तेंव्हाच मी घेईल आणि आपल्या कामात कसूर करत लोकांना वेठीस धरणाऱ्या शिधा { राशन }नाकारणाऱ्या दुकानदारावर कारवाई करा पण बोरोडे काही ऐकायला तयार होत नाही
अशाप्रकारे गैरकारभार करणाऱ्या शिधावाटप दुकांनदारावर कारवाई करण्याऐवजी तक्रारदार यांच्यावर दबाव आणणाऱ्या भ्रष्ट व कामचुकार शिधावाटप निरीक्षक बोरोडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी फाईट फॉर राईट फाउंडेशन चे अध्यक्ष विनोद घोलप यांनी सुद्धा याबाबत आवाज उठविला आहे. तसेच वरील दुकानदार याची सुद्धा चौकशी वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्फ़त करण्यात यावी व नागरिकांना या दुकानातुन त्यांच्या हक्काचे अन्न धान्य मिळण्याची व्यवस्था प्रशासनाने त्वरित करावी
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम