प्राथमिक आरोग्य केंद्रातील “ते” डाॅक्टर कोरोना निगेटीव्ह! नेरळकरांना मिळाला दिलासा; डाॅक्टरांची चौकशी होणार?
- by Adarsh Maharashtra
- Apr 22, 2020
- 1034 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्हयातील नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅ. महेंद्र धादवड वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे नेरळ व आजुबाजुचा परीसरातील लोकांना दिलासा मिळाला आहे. मुबंई येथिल कस्तुरबा रुग्णालय येथून आलेल्या आरोग्य पथकाने त्यांचे स्लॅब चे नमुने घेतले होते. त्यामुळे रात्रीच त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले असुन ते निगेटिव्ह असल्याचे समोर आले आणि नेरळकरांनी सुटकेचा श्वास सोडला. या अहवालामुळे कर्जत आणि मुरबाड या दोन्ही तालुक्याचे टेंशन कमी झाले आसल्याचे बोलले जात आहे.
कर्जत तालुक्यांतील नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय तज्ञ महेंद्र धाडवड यांचा अंबरनाथ येथे असलेला भाऊ पॉझिटिव्ह आहे. आणि त्या भावाचा संपर्कात हे वैद्यकीय तज्ञ आल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने खरेच या वैद्यकीय तज्ञांचा भाऊ कोरोना पाॅझिटीव्ह आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत असून कोरोना ची भीती म्हणून डॉ धाडवड यांनी स्वतःला कोरोन्टाईन करून घेण्यासाठी हा डाव रचला होता काय? याची प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी आता कर्जत आणि मुरबाड तालुक्यातील सर्वसामान्य करीत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे राहणाऱ्या आपल्या भावाला भेटायला 14 एप्रिल रोजी हे वैद्यकीय तज्ञ गेले होते. आणि तेथून येऊन डॉ धाडवड यांनी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात 15 एप्रिल पासून 17 एप्रिल पर्यंत डॉ यांनी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची वैद्यकीय तपासणी करुन ट्रिटमेंट केली आहे. मात्र डॉ धाडवड यांच्या भावाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉ. धाडवड यांना कोरोन्टाइन व्हायला लावले. त्यांना तात्काळ कोरोना टेस्ट करण्याचे आदेशही देणेत आले होते. मात्र असेच असतानाच त्यांनी 20 एप्रिल पर्यंत टेस्टच केली नव्हती.
त्यामुळे डाॅक्टर टेस्ट करुन घेत नसल्याचा गोंगाट सुरू झाला असतानाच कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी मुरबाड चे तहसीलदार अमोल कदम यांना डॉ धाडवड यांचा पत्ता आणि त्यांची पार्श्वभूमीबद्दल लेखी पत्र देऊन कळविले. त्यानंतर मुरबाड तहसीलदार यांच्या आदेशाने तेथील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बोऱ्हाटे हे डॉ धाडवड राहत असलेल्या साई संसार रेसिडेन्सी येथे पोहोचले, आणि त्यांना कोरोना टेस्ट करायला लावली. त्यांचे स्लॅब हे मुंबई येथून आलेल्या आरोग्य यंत्रणेने नेले होते. त्यानंतर डाॅक्टर धाडवड यांचा रिपोर्ट काय येतो? याचीच चर्चा नेरळ आणि मुरबाड तालुक्यांत सुरु होती. डाॅक्टर कोरोना पाॅझिटीव्ह आला तर मोठी पंचाईत होईन असे बोलले जात होते. असे असतानाच अखेर काल रात्री त्यांचा रिपोर्ट आला. डॉ धाडवड पती पत्नी यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आणि साऱ्यांना दिलासा मिळाला.
डाॅक्टर कोरोना भावाचा संपर्कात आल्याने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅक्टरांचा संपर्कात आलेले त्यांचे कर्मचारी आणी उपचार करणेत आलेले परिसरातील रुग्ण ज्याप्रमाणे घाबरले होते, त्याच प्रमाणे मुरबाड तालुका देखील टेंशन मध्ये होता असे समजते. कारण डॉ धाडवड हे त्यांच्या पत्नीसह अंबरनाथ येथे 14 एप्रिल रोजी गेले होते. आणि डॉ धाडवड यांची पत्नी या मुरबाड तालुक्यातील शिरोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यात नेरळ येथून डाॅक्टरांना कोरोन्टाइन व्हायला सांगितल्यावर ते मुरबाड येथील ग्रामीण रुग्णालयात देखील जाऊन बसायचे अशी माहीती मिळाली आहे. त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असती तर मग कर्जत तालुकाच नाही तर मुरबाड तालुक्यातील शेकडो लोकांची तपासणी करावी लागणार होती. मात्र आता त्या टेस्टचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने सारेच निश्चिंत झाल्याचे सांगणेत येत आहे.
दरम्यान नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी केली असता परदेश दौरे करून आलेले लोक नेरळ परिसरात आल्यानंतर कोरोना आपल्याला होईल या भीतीने ग्रासलेले हे वैद्यकीय अधिकारी आपले कर्मचारी यांना सांगून त्या संशयीतांची तपासणी करायला पाठवायचे. त्यामुळे त्यांना स्वतःला कोरोना ची भीती असायची, अशी चर्चा आरोग्य खात्यात सुरु आहे. त्यामूळे याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय? हे स्पष्ट होणेची मागणी होत आहे. तसेच डॉ धाडवड यांचे भाऊ खरेच कोरोना पॉझिटिव्ह आहेत की कसे? हे तपासण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. अंबरनाथ तालुक्यांचे तहसीलदार यांच्याशी कर्जत तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांनी त्या बाबतीत शहानिशा करण्याची मागणी होत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम