रायगडातील आदिवासी बांधवांना लाॅकडाऊन असेपर्यंत अन्नधान्य द्यावे;- भाई जगदीश गायकवाड यांची मागणी!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- देशात कोरोनाने थैमान घातल असुन देशात आता ३ मे पर्यंत लाॅकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे, रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलिस खाते कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रंचड प्रयत्न करीत आहे. त्यामुळे घरात राहा, सुरक्षित राहुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आज रिपाइंचे (आठवले) कोकण प्रदेश अध्यक्ष तथा रायगड जिल्हा अध्यक्ष आणि पनवेलचे उपमहापौर जगदीशभाई गायकवाड यांनी जनतेला केले.

 रायगड जिल्ह्यातील बहुतांशी भाग हा आदिवासी असल्याने या आदिवासी भागातील मंडळी हातावर कमवुन पानावर खातात, मोलमजुरी करुन हे आदिवासी बांधव उदरनिर्वाह करीत असतात. त्यामुळे या आदिवासी बांधवांना लाॅक डाऊन असे पर्यंत अन्नधान्य पुरविण्यात यावे अशीही मागणी रिपाइचे कोकण प्रदेश व रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे उपमहापौर भाई जगदीश गायकवाड यांनी रायगड जिल्हाअधिकाऱ्यांकडे केली आहे.

रायगड जिल्ह्यात राहत असणाऱ्या अनेक आदिवासी कुटुंबात ७ ते ८ माणसे असतात, शासन एका कुटुंबाला १० किलो धान्य देते, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली अाहे. त्यामुळे हे धान्य या कुटुंबाला किती दिवस पुरणार? असा सवाल भाई जगदीश गायकवाड यांनी उपस्थितीत करुन या कुटुबांना लाॅक डाऊन असे पर्यंत शासनाने अन्नधान्य पुरविण्यात येणे गरजेचे असल्याने तशी मागणी रायगडचा जिल्हाधिकाऱ्यांकडे भाई जगदीश गायकवाड यांची आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान कोरोना महामारीत भुकेने कोणी मरु नये, याकरता कोणी भुखी तर नाही ना, याकडेही शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे उपमहापौर जगदीशभाई गायकवाड यांना वाटत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी दुरध्वनीद्वारे बोलताना सांगितले आहे. त्यामुळे पनवेलचे उपमहापौर जगदीशभाई गायकवाड हे पनवेल शहरात व आजुबाजुचा परीसरात हजारो लोकांना रोज सोशल डिस्टन्स पालुन जेवण पुरवीत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. लाॅक डाऊन कालात कोणीही उपाशी राहु नये याची दक्षता शासनानेही घ्यावे असेही ते म्हणाले आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट