बदलापुरात कोरोनाचे दोन नवे रुग्ण.
आठवड्याभरात रुग्णसंख्या १३
- by Rameshwar Gawai
- Apr 19, 2020
- 522 views
बदलापूर / प्रतिनिधी : तीन कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने बदलापूरातील ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती गुरुवारी पुढे आली होती. त्यानंतर शुक्रवारी आता आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाली असल्याने बदलापुरात कोरोना रुग्णांची संख्या १३ वर पोहचली आहे.
शुक्रवारी (ता.१७) बदलापुरातील दोन कोरोना रुग्ण आढळून आले असून एक शिरगाव तर दुसरा कात्रप भागात राहणार आहे. त्यापैकी एकजण मुंबईतील शासकीय रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होता. तर दुसरा छातीत काहीतरी त्रास असल्याने ७ एप्रिलला सायन रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाला होता. या दोघांनाही उपचारार्थ सध्या मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी दशरथ राठोड यांनी दिली. सुमारे आठवड्याभरापूर्वी बदलापूर पूर्व भागात एका ४५ वर्षीय महिलेला व तिच्या २० वर्षीय मुलीला तसेच बदलापूर पश्चिम भागात एका २८ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कुळगाव बदलापुर नगर परिषद प्रशासनाने हे दोन्ही परिसर सील केले होते. तसेच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना क्वांरटाईन केले होते. त्यांचे नमुने स्वॅप तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याबाबतचा अहवाल गुरुवारी नगरपरिषदेला प्राप्त झाला. त्यामध्ये ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या आठ जणांना उपचारार्थ ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नगराध्यक्षांचे आवाहन .
या पार्श्वभूमीवर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना 'घरात रहा, सुरक्षित रहा' आणि प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन केले आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम