गँस वितरण टेंपोमधून नांदेडला पलायन करणाऱ्या परिवाराची नामी युक्ती.
- by Rameshwar Gawai
- Apr 19, 2020
- 1074 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : सध्या देशात कोरोनाच्या प्रतिबंधाकरीता लाँकडाऊन सुरू आहे. यामुळे अनेक हातमजुरी करणारे कुटुंब आहे तिथेच स्थानबद्ध झाले त. मात्र, उपासमारीला कंटाळून अनेक कामगारांचे.लोंढेच्या लोंढे आपापल्या गावी परतण्यासाठी धडपडतायेत. परंतु, संचारबंदी मुळे ते शक्य होत नसल्याने एका कुटुंबाने यावर नामी युक्ती शोधून काढली चक्क घरगुती गँस वितरणाच्या गाडी मध्ये लपुन हे कुटुंब आपल्या गावी परतण्याच्या प्रयत्नात होते. परंतु, पोलिसांनी तो अर्ध्यातच हाणून पाडला.
घरगुती गॅस ही जीवनावश्यक सेवेत मोडत असल्यामुळे शासनाने या वाहनांना परवानगी दिली आहे. याचा फायदा घेत घरगुती गँस वितरकाच्या गणवेशात दोघेजण गॅस सिलेंडर वाहतुक करणाऱ्या वाहनातून आपल्या कुटुंबाला नांदेड ला घेऊन निघाले होते.ठाण्या च्या मानपाडा जवळील चितळसर येथून नांदेड येथे पलायन करु पाहणार्या कुंटुंबाला उल्हासनगर पोलीसांना संशय आला म्हणून रोखले.
चितळसर या ठिकाणी राहणाऱ्या एका परिवारातील महिला, पुरुष, व लहान मुल असे एकुण १५ ते २० जण लाँकडाऊन वाढल्याने व अन्नधान्याची कमतरता भासल्या मुळे आपल्या गांवी नांदेड येथे निघाले होते . पोलीस अडवतील या भितीने त्यांनी ही नामी युक्ती लढवली होती. गँस सिंलेडरची वाहतूक करणाऱ्या अँपे रिक्षाच्या बनवलेल्या कॅबिनमध्ये बसून नांदेड येथे हा परिवार निघाले होते.
परंतु, सकाळी सहा वाजेच्या सुमारास उल्हासनगर पोलीस ठाण्याचे व.पो.नि राजेंद्र कदम ह्यांच्या मार्गदर्शनखाली शहाड स्टेशन लगत असलेल्या पुला शेजारील नाकाबंदी करण्यात आलेल्या चौकीवर
हा अँपे अडवला. आणि संशय आल्याने पोलिसांनी मागील कँबिन उघडताच हा परिवार निदर्शनास आला. या चौकीवर ड्युडी करत असलेले पो.ह.चौधरी,पो.शि.सांबरे, पो.शि.कोपनी, पो.शि.भताने ह्यांना गाडी चालक व सिलेंडर गाडीवर संशय आल्याने गाडी थांबवुन तपासणी केली. ठाणे पोलीसांंच्या डोळ्यात धुळफेक करित जिल्हा हद्द पार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ठाणे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु उल्हासनगर पोलीसांच्या कार्य तत्परते व जागृते मुळे सदर परिवारातील लोकांचा जिल्हा पार करण्याचा डाव हाणुन पा डला. उल्हासनगर पोलीसांनी त्यांना माघारी पाठवत घरीच रहा असे आव्हान केले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम