उल्हासनगरात मच्छरांचा कहर . महापालिकेची फॉगिंग यंत्रणा फेल .
- by Rameshwar Gawai
- Apr 19, 2020
- 613 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : देशात राज्यात कोरोनाचा कहर वाढत चाललेला आहे . त्यामुळे शासकिय स्तरावर सर्वत्र प्रयत्न करन्यात येत आहेत . तर कोरोनाच्या निमित्ताने देश लॉकडाऊन सुध्दा केलेला आहे . दरम्यान उल्हासनगर महापालिकेने कोरोना चा प्रादुर्भाव रोखन्या साठी चांगले प्रयत्न केले आहेत . परंतु शहरात दिवसे दिवस मच्छरांचा कहर दिसुन येत आहे . या मच्छराना मारणारी महापालिकेची फॉगिंग यंत्रणा सफसेल फेल झाली आहे .
उल्हासनगर शहर हे फक्त १३ किलो मीटर ऐवढ्या शा लहान क्षेत्रफळात दाटीवाटीने बसलेले आहे . या शहरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्या असुन सदर झोपडपट्या सुध्दा अत्यंत दाट आहेत . तर या शहरात भंगार व्यवसाय अधिक ठिकाणी सुरु आहेत . त्यामुळे साफ सफाई च्या अभावामुळे येथे मच्छरांचा प्रदुर्भाव दिवसे दिवस वाढत चालला आहे . दरम्यान महापालिकेचा आरोग्य विभाग या मच्छराना पळवन्यासाठी फॉगिंग यंत्रणा राबवत असते . परंतु फॉगिंग करताना त्या मशीन मध्ये मच्छर मारणारी दवा टाकन्यात येते किंवा नाही . या बाबत संशय व्यक्त होत आहे . कारण फॉंगिंग करतानी जो धुर निघतो त्या धुरातुन फक्त डिझेलचाच वास येते . या फॉगिंगच्या धुराने देखिल हे मच्छर मरत नाहीत . तेव्हा या मच्छरानी संपुर्ण शहरावर कब्जा केला आहे . या मच्छराना मारन्यासाठी नागरिकाना वेगवेगळ्या अगरबत्ती . स्प्रे यांचा वापर करावा लागत आहे . तरी पण हे मच्छर जात नसल्याने शहरात टायफाईड . मलेरिया या आजाराने तोंड वर काढले आहे . दरम्यान महापालिका कोरोना व्हायरस ला रोखन्या साठी अत्यंत प्रभावी पणे प्रयत्न करत आहेत . तर शहरात एक ही कोरोना ग्रस्त रुग्ण नाही . त्यामुळे आयुक्त सुधाकर देशमुख आणि आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी हे फारच मेहनत घेत असल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे . मात्र या शहरात मच्छरानी कहर केल्याने नागरिक या पासुन त्रस्त आहेत .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम