विक्रोळीत कोरोना बाधित महिलेवर अंत्यसंस्कार झाल्यावर दुसऱ्यादिवशी तिचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह.

मुंबई : ( जीवन तांबे )श्वसन विकार आणि न्यूमोनिया आजारांच्या रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मुंबई महापालिका रुग्णालयात  दाखल केल्यानंतर  कोरोना संशयित रुग्ण म्हणून  तातडीने वैद्यकीय उपचार  करत आहे मात्र रुग्णाची चाचणी वेळेत करावी अन्यथा कोरोना संशयित रुग्णाच्या संपर्कातील नातेवाईक नाहक कोविड 19 चे शिकार होत असल्याने त्यांच्या जिवावरही बेतू शकते, असा आरोप विक्रोळीमधील कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेचे भाऊ प्रेमचंद वाघमारे यांनी केला.

विक्रोळी विभागत देखील कोरोना रुग्णांची सांख्य ही झपाट्याने वाढताना दिसत आहे त्यातच धक्कादायक प्रकार हा विक्रोळी पूर्वे येथील टागोरनगर परिसरातील  हरियाली व्हिलेजमध्ये रहाणाऱ्या एका 56 वर्षीय महिलेला श्वसन विकाराचा त्रास जाणवू लागल्याने तिला ता.15 एप्रिल रोजी टागोर नगर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्रास अधिक जाणवत असल्याने पुढील उपचारासाठी पालिका रुग्णालयात हलवण्याचे नातेवाइकांकडे सांगण्यात आले. रुग्णवाहिका सोय नसल्याने 3 तासापेक्षा अधिक वेळ विक्रोळीत गेल्यानंतर एका रुग्णासह त्या महिलेस सायन येथील पालिकेच्या टिळक रुग्णालयात कोविड कक्षात हलविण्यात आले आणि उपचार सुरू असताना ता. 17 एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला व मृतदेह कुटुंबाकडे देण्यात आला.

नातेवाइकांनी अंत्यसंस्कार देखील केले. यावेळी कोविड 19 चे कोणतेही रेपोर्ट आले नसल्याने बरेच नातेवाईक अंत्यसंस्कार कार्यात सहभागी झाले होते. परंतु अंत्यसंस्कार झाल्यानंतर ता. 18 तारखेला तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे त्याचप्रमाणे आता अंत्यसंस्कार साठी गेलेल्या व हॉस्पिटलमध्ये तिच्या संपर्कात आलेल्या त्या सर्वांना कोरोन्टाईन करण्यात आले आहे. व त्याच प्रमाणे त्यांची कोरोनाची तपासणी देखील करण्यात येणार आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने व पोलिसांनी आजूबाजूचा परिसर सील केला आहे

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट