धारावीत ११७ कोरोनाबाधित। आज नवे १६ रुग्ण

मुंबई, (प्रतिनिधी) : वरळीनंतर मुंबईकरांचे लक्ष असलेल्या धारावीने शुक्रवारी कोरोनाबाधितांची शंभरी पार केली होती. शिवाय आज शनिवारी 16 रुग्ण अधिक सापडले. त्यामुळे येथील रुग्णसंख्या  117 झाली आहे.  येथे चिंतेचे वातावरण आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी  महापालिकेच्या आरोग्य खात्यानेही कंबर कसली आहे. जी नॉर्थ विभागातर्फे खास धारावीसाठी  डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांची तातडीची भरती करण्यात येत आहे. जी नॉर्थ विभागात भरतीसाठी मोठी रांग लागली होती.

गुरुवारी सकाळी धारावीत करोनाचे ११ रुग्ण सापडले होते, मात्र त्यानंतर आणखी १५ रुग्ण सापडले.  तेथे कोरोना रुग्णांची संख्या ८६ झाली होती. शिवाय शुक्रवारी आणखी 15 रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या आता 101 झाली, तर शनिवारी 16 रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्या 117 झाली आहे. शिवाय 10 रुग्ण मरण पावले आहेत.

 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट