धारावीत आणखी आढळले ११ पोजिटीव रुग्ण मुंबईत १०७ पोजिटीव रुग्ण
- by Adarsh Maharashtra
- Apr 16, 2020
- 364 views
मुंबई - मुंबईकरांची काळजी वाढवणारी परिस्थिती निर्माण होत आहे. कोरोना बधितांची संख्या रोज वाढत आहे.काल 24 तासात 107 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे.त्यामुळे बधितांची एकूण संख्या 2403 इतकी झाली आहे. मुंबईत आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतही रोज बधितांची संख्या वाढत आहे. काल नव्याने 11 बाधित रुग्ण आढळून आले आहे.
अत्यंत दाटीवाटीचा विभाग असलेला धारावी विभाग तसा संवेदनशील आहे.लघु उद्योगाने या झोपडपट्टीवर चांगलाच कब्जा केला आहे.त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांची ही संख्या लक्षणीय असते. धारावी सोबतच वरळी कोळीवाडा, वरळीची जिजामाता नगर झोपडपट्टी, चेंबूरच्या पी एल लोखंडे मार्गावरील मुकुंद नगर व इतर झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने मुंबईकरांची काळजी वाढली आहे. धारावीत नवे 11 बाधित रुग्ण आढळल्यामुळे तेथील बधितांची संख्या आता 71 झाली आहे.कालच्या 11 रुग्णांमध्ये मुकुंद नगर मधील 4 रुग्ण आहेत.त्यामुळे मुकू नगरमधील बधितांची संख्या 18 झाली आहे.धारावीत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.त्यात एका खाजगी डॉक्टरांचाही समावेश आहे.
दरम्यान, काल महाराष्ट्रात 3081 बाधित रुग्ण झाले आहेत.काल 24 तासात 165 नवे बाधित रुग्ण आढळले.
हॉटस्पॉट जिल्ह्यात मुंबई पहिली
महाराष्ट्रात 11 जिल्हे हॉट स्पॉट जिल्हे जाहीर करण्यात आले आहेत.ज्या जिल्ह्यात 15 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.ते जिल्हे हॉट स्पॉट जिल्हे म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.यात पहिला क्रमांक मुंबईचा आहे.त्यानंतर ठाणे, पुणे,नाशिक, सांगली, अहमदनगर, नागपूर, यवतमाळ, ओरंगाबाद, बुलढाणा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सर्वांनी लॉक डाऊन चे काटेकोरपणे पालन करण्यासही बजावण्यात आले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम