बदलापूर नगरपालिका अंतर्गत दुबे रुग्णालयात कामकरणाऱ्या आशा स्वयंसेविकाना राष्ट्रवादीतर्फे मोफत जीवनाश्यक वस्तूचे वाटप.

बदलापुर / प्रतिनिधी : बदलापूर नगरपालिका अंतर्गत दुबे रुग्णालयात कामकरणाऱ्या आशा स्वयंसेविका ह्या नाममात्र दोन हजार महिना मानधनावर राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या आदेशानुसार जनजागृतीचे काम करतात. त्यांना मिळणारे मानधन हे खूपच कमी असून आपला जीव धोक्यात टाकून त्या अल्प मानधनावर काम करत आहेत. याबाबत  सौ.संजीवनी पाटील यांनी त्यांची व्यथा राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशचिटणीस  कालिदास देशमुख यांच्यासमोर मांडली. त्यांनीं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी राष्ट्रवादीतर्फे मदत केली असून त्यांच्या व्यथा ऐकून तात्काळ आपल्या कार्यकर्ते लक्ष्मण फूलोरे, अमित कदम, गणेश थिटे, सुधीर जाधव आणि सौ.अनिशा खान यांच्या उपस्थितीत आशा स्वयंसेविका यांना सरकारने दिलेल्या सर्व नियमाचे पालन करून व सामाजिक अंतर ठेवून  जीवनाश्यक वस्तूचे वाटप केले. मोफत जीवनाश्यक वस्तूचे वाटप केल्यानंतर त्यांनीं  आशा टाळ्या वाजवून कालिदास देशमुख यांचे आभार मानले.

संबंधित पोस्ट